Full Width(True/False)

४९९ रुपयांत १०० GB डेटा, जिओ-एअरटेलपेक्षा BSNLचा बेस्ट प्लान?

नवी दिल्लीः बीएसएनएलने नुकताच ४९९ रुपयांचा ब्रॉडब्रँड प्लानमध्ये बदल केला आहे. अनेक परिसरात ४९९ रुपयांचा भारत फायबर प्लान एक एन्ट्री लेवल प्लान आहे. बीएसएनएलने आता या प्लानमध्ये 50 Mbps च्या स्पीडवर 100GB डेटा देण्याचा निर्णय घेतला आहे. बीएसएनएलच्या ४९९ रुपयांच्या प्लानची तुलना जिओ फायबर एअरटेलच्या एक्स्ट्रिम फायबर सोबत केली जात आहे. वाचाः ४९९ रुपयांचा Bharat Fiber प्लान या प्लानमध्ये १०० जीबी डेटा पर्यंत 50 Mbps ची स्पीड मिळणार आहे. लिमिट संपल्यानंतर ही स्पीड 2 Mbps होते. यात ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यात कोणत्याही प्रकारची ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळत नाही. अनेक परिसरात कंपनी ४४९ रुपयाचा प्लान ऑफर करते. ज्यात ३० एमबीपीएसच्या स्पीड सोबत ३.३ टीबी डेटा ऑफर केले जाते. वाचाः ३९९ रुपयांचा JioFiber प्लान जिओचा हा प्लान बीएसएनएलच्या ४४९ रुपयांच्या प्लानसारखाच आहे. यात 30 Mbps च्या स्पीडसोबत 3.3TB (3,333GB) डेटा ऑफर केला जातो. यात ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. बीएसएनएल प्रमाणे या प्लानध्ये ओटीटी अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळत नाही. वाचाः ४९९ रुपयांचा Airtel Xstream Fiber प्लान बीएसएनएल आणि जिओच्या प्लान प्रमाणे एअरटेलचा प्लान सुद्धा 3.3TB डेटा ऑफर करतो. यात 40 Mbps ची स्पीड दिली जाते. तसेच सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या प्लानमध्ये Voot Basic, Hungama Play, Eros Now, Ultra, Shemaroo Me यासारखे ओटीटी प्लॅटफॉर्म्सची मेंबरशीप दिली जाते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37RREVW