Full Width(True/False)

सॅमसंग गॅलेक्सी M31 Prime लवकरच होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्लीः सॅमसंग आपली प्रसिद्ध गॅलेक्सी एम सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा स्मार्टफोन या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Galaxy M31 आणि Galaxy M31s ला ज्वॉईन करणार आहे. सॅमसंगच्या या अपकमिंग स्मार्टफोनचा प्रोमो पेज अॅमेझॉन इंडियावर लाइव करण्यात आला आहे. यात या फोनचा फोटो सह काही वैशिष्ट्यांची डिटेल्स दिली आहेत. वाचाः अॅमेझॉन पेजवर फोनची माहिती दिली नाही. परंतु, प्रसिद्ध टिप्स्टर सुधांशूने एक ट्विट करून याची डिटेल्स शेयर केली आहे. नोटिफाय मी ऑप्शनवर रजिस्टर केल्यानंतर रिसिव्ह होणाऱ्या ईमेल डिव्हाईसचे नाव गॅलेक्सी M31 प्राइम दिसत आहे. या ईमेलमध्ये फोनचे काही डिटेल्स दिले आहेत. वाचाः डिझाइन मध्ये हा फोन एकदम गॅलेक्सी एम३१ सारखा आहे. यात वॉटरड्रॉप नॉच सोबत कॅमेरा डिझाईन आणि फिंगरप्रिंट पोझिशन एकसारखे आहे. वाचाः गॅलेक्सी एम प्राईमचे वैशिष्ट्ये हा फोन ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनमध्ये येते. फोनमध्ये 2.3Ghz सोबत 10 nm Exynos 9611 प्रोसेसर दिला आहे. फोनची मेमरीला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेनस्र दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. तसेच यूएसबी सी पोर्ट द्वारे १५ वॉटची फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. हा फोन कधीपर्यंत लाँच करणार आहे, याबद्दल कंपनीने अद्याप स्पष्ट केले नाही. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2FbPftc