Full Width(True/False)

भारतातील PUBG मोबाइल चाहत्यांसाठी बॅड न्यूज, गेम बंद म्हणजे बंद

नवी दिल्लीः प्रसिद्ध मोबाइल अॅक्शन गेम च्या चाहत्यांसाठी एक बॅड न्यूज आहे. भारतात आता पबजी गेम पूर्णपणे बंद होणार आहे. भारत सरकारने २ सप्टेंबर रोजी या गेमच्या दोन्ही व्हर्जनवर Mobile आणि PUBG Mobile Lite वर बंदी घातली होती. या बंदीनंतर या अॅप्सला अॅपल अॅप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवरून हटवले होते. परंतु, ज्या युजर्सच्या फोनमध्ये हा गेम आधीच डाउनलोड होता. ते युजर्स आतापर्यंत गेम खेळत होते. वाचाः पबजी मोबाइलची पब्लिशर कंपनी ने अखेर भारतीय युजर्ससाठी आपली सर्विस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने ही घोषणा अचानक केली असली तरी हे होणार होते. कारण, बंदी घातलेले दुसरे अन्य चायनीज अॅप्स आधीच बंद झालेले आहे. वाचाः चाहत्यांसाठी लिहिली पोस्ट पबजी मोबाइल इंडियाने एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. सर्विस बंद करण्याची घोषणा या पोस्टमधून करण्यात आली आहे. पोस्टमध्ये लिहिले, डियर फॅन्स, २ सप्टेंबर २०२० रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना मंत्रालयाच्या अंतरिम आदेशाचे पालन करीत Tencent गेम्स ३० ऑक्टोबर पासून भारतीय युजर्संसाठी पबजी मोबाइल आणि पबजी मोबाइल लाइटची सर्व सर्विस बंद करणार आहे. वाचाः डेटा प्रायव्हसीवर हे सांगितले कंपनीने आपल्या पोस्टमध्ये युजर्संना डेटा प्रायव्हसीचा उल्लेख केला. तसेच लिहिले की, युजरची डेटा सुरक्षा नेहमी आमच्यासाठी प्रथम राहिली आहे. आम्ही नेहमी भारतातील डेटा सुरक्षा कायदा आणि नियमांचे पालन केले आहे. सर्व युजर्सला गेम प्ले इनफॉर्मेशन आमच्या प्रायव्हसी पॉलिसीत सांगितलेल्या पद्धतीने प्रोसेस केली जाते. आम्हाला सर्विस बंद करण्यात येत असल्याने दुःख होत आहे. भारतात पबजीला मिळालेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी तुम्हा सर्वांच आभार. धन्यवाद. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31VRysB