Full Width(True/False)

त्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं तर छवी कुमार जिंकली असती १ कोटी रुपये

मुंबई- '' मध्ये अखेर तो क्षण आला ज्याची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होतं. जेव्हा कॉम्प्युटरवर १ कोटींचा प्रश्न विचारण्यात आला. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील राहणाऱ्या यांनी अविस्मरणीय पद्धतीने खेळ खेळला. त्यांनी एक एक करून १४ प्रश्नांची उत्तरं दिली आणि ५० लाख रुपये जिंकले. त्यांना १ कोटी रुपये जिंकण्याचीही संधी होती पण छवी या १ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या नाहीत. छवी यांच्या चेहऱ्यावर होती चिंता, तर यांच्या मनात उत्साह छवी कुमार या एक रोलओव्हर स्पर्धक होत्या. बुधवारनंतर त्या गुरुवारच्या एपिसोडमध्येही हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांची हुशारी पाहून अमिताभही स्तब्ध झाले होते. तिथे उपस्थित साऱ्यांनाच छवी १५ व्या प्रश्नाचंही योग्य पद्धतीने उत्तर देईल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. त्या प्रश्नाला छवी गोंधळून गेल्या. १५ वा प्रश्न कॉम्प्युटरवर दिसल्यावर छवी यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. तर बिग बी त्यांच्याकडे उत्साहाने पाहत होते. गुरुवारी १ कोटीसाठी विचारण्यात आलेला प्रश्न प्रश्न- २०२४ पर्यंत पहिली महिला आणि पुढील पुरुषाला चंद्रावर पाठवण्याच्या अमेरिकन अंतराळ कार्यक्रमाचं नाव कोणत्या ग्रीक देवाच्या नावावर ठेवलं आहे? अ. रिया ब. नेमेसिस क. फ्रोडाइट ड. अर्टेमिस हा प्रश्न समोर येताच छवीला या प्रश्नाचं उत्तर माहीत नसल्याचं कळलं. त्या अ आणि ड या दोन पर्यायांमध्ये संभ्रमात असताना दिसली. बरीच वर्षे झगडल्यानंतर अमिताभ बच्चन यांनीही छवी यांना सांगितलं की त्यांनी खूप मेहनतीने ५० लाख रुपये कमावले आहेत. ते चुकीचं उत्तर देऊन गमावू नका. यानंतर छवीने बिग बी यांचा सल्ला मानत गेम सोडण्याचा निर्णय घेतला. योग्य उत्तर होतं ड. छवीने लावलेला चुकीचा अंदाज नियमानुसार गेम सोडण्यापूर्वी छवीला आपलं एक उत्तर द्यायचं असतं. तिने जो पर्याय निवडला तो चुकीचा ठरला. त्यामुळेच छवीचा गेम सोडण्याचा निर्णय योग्य असल्याचं दिसलं. कारण या प्रश्नाचं योग्य उत्तर ड म्हणजे ऑर्टेमिस हे होतं. छवीच्या मुलीला आहे पाच लाखांची शिष्यवृत्ती छवी कुमार यांनी ५० लाख जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि तोंड गोड करण्याचाही सल्ला दिला. इतकंच नाही तर अमिताभ यांनी वेदांतूतर्फे छवीच्या मुलीला पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jDNdQB