नवी दिल्लीः विवोने स्मार्टफोनच्या लाँचिंग संदर्भात माहिती शेयर केली आहे. कंपनीने भारतीय बाजारात Vivo V20 SE ची किंमत आणि उपलब्धतेला दुजोरा दिला नव्हता. परंतु, आता एका रिटेलरच्या लिस्टिंगवरून ही माहिती समोर आली आहे की, या फोनला देशात २० हजार ९९० रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात येणार आहे. आता ९१ मोबाइलच्या एका रिपोर्टवरून या फोनच्या लाँचिंग आणि प्री बुकिंग ऑफर्स संबंधी माहिती समोर आली आहे. Vivo V20 SE भारतात २ नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे. वाचाः Vivo V20 SE भारतात किंमत Vivo V20 SE ला देशात २० हजार ९९० रुपये किंमतीत लाँच करण्यात येईल. हा फोन ग्रेविटी ब्लॅक, आणि एक्वॉमरीन ग्रीन कलरमध्ये मिळणार आहे. रिपोर्टमध्ये शेयर करण्यात आलेल्या एका प्रमोशनल पोस्टरवरून हे उघड झाले आहे. ICICI Bank, कोटक बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना १० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. वाचाः तसेच विवो अपग्रेड प्रोग्राम अंतर्गत वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट आणि जिओ तसेच वोडाफोन-आयडियाचे १० हजारांपर्यंत फायदे मिळतील. हँडसेटला ऑफलाइन चॅनेलवरून प्री ऑर्डर साठी उपलब्ध होईल. वाचाः फोनचे फीचर्स या फोनमध्ये ६.४४ इंचाचा एस अमोलेड डिस्प्ले आहे. याची रिझॉल्यूशन फुल एचडी प्लस असणार आहे. स्क्रीन आस्पेक्ट रेशियो २०.९ असणार आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ मोबाइल प्लॅटफॉर्म दिला गेला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठीयत 4100mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिली आहे. ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37XHh2L