Full Width(True/False)

WhatsApp व्हिडिओ पाहिल्यास फोन हॅक होणार?, जाणून घ्या खरं कारण

नवी दिल्लीः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर एक दुसऱ्याला कनेक्ट करण्याचे काम केले जाते. परंतु, या ठिकाणी फेक मेसेजमुळे मोठी अडचण वाढताना दिसत आहे. व्हॉट्सअॅपवर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे. ज्यात म्हटले की, जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर एखादा व्हिडिओ पाहिला तर १० सेकंदात तुमचा अँड्रॉयड फोन किंवा आयफोन हॅक होऊ शकतो. व्हॉट्सअॅप ग्रुपवर येत असलेला हा मेसेज अनेकांची डोकेदुखी ठरत आहे. वाचाः फोनला हॅक करणाऱ्या व्हिडिओचे नाव '' सांगितले जात आहे. Full Fact च्या माहितीनुसार, या मेसेजमध्ये लिहिले की, व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ शेयर करणे सुरू केले आहे. यात दिसत आहे की, भारतात कोविड १९ कशाप्रकारे कमी होत आहे. या फाईलचे नाव 'India is doing it'आहे. याला ओपन करू नका. हा केवळ १० सेकंदात फोनला हॅक करीत आहे, असा मेसेज येत आहे. वाचाः अफवा आहे मेसेज व्हायरल मेसेजमध्ये शेवटी म्हटले की, अलर्ट, आपल्या फ्रेंड्सला आणि फॅमिली पर्यंत पोहोचवा. तसेच व्हिडिओ संबंधी टीव्हीच्या बातम्यात सुद्धा सांगितले आहे. फॅक्ट चेकिंग सर्विस बुमच्या म्हणण्यानुसार, हा मेसेज पूर्णपणे फेक आहे. असाच एक मेसेज २०२० च्या सुरुवातीला व्हायरल झाला होता. परंतु, भारत ऐवजी अर्जेटिंनात याला शेयर केले जात आहे. सध्या यासंबंधी काही पुरावा नाही. व्हिडिओच्या मदतीने हॅकिंग केली जात असल्याचे अद्याप पुरावा नाही. वाचाः फेक मेसेज शेयर करू नका व्हॉट्सअॅपवर अशा फेक मेसेजचा उद्देश असतो की तो जास्तीत फॉरवर्ड करावा. त्यामुळे असे मेसेज फॉरवर्ड करू नये. जर असा मेसेज आला तर त्याचा टेक्स्ट गुगल सर्च करू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Thh4U8