Full Width(True/False)

स्मार्ट टीव्हीमध्ये Xiaomi ची धूम, १.४ कोटीहून जास्त शीपमेंट

नवी दिल्लीः शाओमी मार्केटमध्ये लागोपाठ आपली पकड मजबूत करीत आहे. तसेच, कंपनी स्मार्ट टीव्ही मार्केटिंग संबंधित आकडेवारी जारी करीत आहे. आता एका नवीन रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे की, शाओमीला या वर्षी बाजारात १.४ कोटीहून जास्त स्मार्ट टीव्ही विकण्याची अपेक्षा आहे. वाचाः गेल्या वर्षीच्या तुलनेत शीप होणाऱ्या स्मार्ट टीव्हीच्या संख्येत १ मिलियनची वाढ झाली आहे. कंपनीने या वर्षी १.६ कोटी स्मार्ट टीव्ही विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. परंतु, कोविड १९ महामारीमुळे यावर परिणाम झाला आहे. शाओमी टीव्हीचा सेलमुळे कंपनीच्या वेंडर्स यासारख्या मीडियाटेक आणि Ruixuan ला फायदा मिळणार आहे. नुकतीच बातमी समोर आली होती की, चीनमध्ये २०२० च्या पहिल्या सहामाहीत सर्वात मोठी स्मार्ट टीव्ही वेंडर बनली आहे. २०१९ मध्ये चिनी मार्केटमध्ये शाओमी स्मार्ट टीव्ही शीपमेंट आणि विक्री मध्ये नंबर वन कंपनी बनली आहे. यात Skyworht, Hisense आणि TCL सारख्या कंपन्यांना मागे टाकले होते. वाचाः गेल्या वर्षी २०१९ मध्ये कंपनीने ही माहिती दिली होती की, १०.४६ मिलियन स्मार्ट टीव्हीच्या सेलसोबत चिनी मार्केटमध्ये पहिला टीव्ही ब्रँड बनले आहे. कंपनीने १ कोटी हून जास्त युनिट एका वर्षात शीप केली होती. चीन शिवाय, शाओमी स्मार्ट टीव्हीला भारतात चांगला प्रतिसाद मिळत आहे. २०१८ मध्ये मी टीव्ही ब्रँडच्या देशात एन्ट्री केल्यानंतर कंपनीने ६ महिन्यात ५ लाखांहून जास्त मी टीव्हीची विक्री केली होती. आता देशात सर्वात मोठा स्मार्ट टीव्ही ब्रँड्स मध्ये सहभागी झाले आहे. भारतीय मार्केटमध्ये ३३ टक्क्यांहून जास्त भागीदारी शाओमी टीव्हीची आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HtzSgP