Full Width(True/False)

6000mAh बॅटरी स्मार्टफोनचा उद्या सेल, किंमत ६९९९ रु, डिस्काउंटही मिळणार

नवी दिल्लीः Infinix ने नुकताच आपला बजेट फोन भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल रविवारी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. हँडसेटला ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. सेलची सुरुवात दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये मोठी बॅटरी आणि मोठी स्क्रीन दिली आहे. या फोनची किंमत आणि त्याची खास वैशिष्ट्ये जाणून घ्या. वाचाः वाचाः फोनची किंमत व ऑफर्स इनफिनिक्स स्मार्ट ४ ला देशात ६ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले आहे. फोनला एक्सक्लूसिव म्हणून फ्लिपकार्टवर उद्या दुपारी १२ वाजता विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. फोन मिडनाइट ब्लॅक, ओशन वेव, स्यान आणि वॉयलेट कलरमध्ये येतो. फ्लिपकार्ट वरून अॅक्सिस, सिटी, आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट तसेच डेबिट कार्ड व ईएमआय ट्रान्झॅक्शन द्वारे फोन खरेदी केल्यास १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. वाचाः वाचाः फोनची वैशिष्ट्ये या फोनध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, फोन ३८ तासांपर्यंत ४ जी टॉकटाईम, ४४ तासांपर्यंत म्यूझिक प्लेबॅक टाइम आणि २३ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक मिळू शकतो. या फोनमध्ये ६.८२ इंचाचा एचडी प्लस इनसेल आयपीएस डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो ए २२ प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l9NgoR