Full Width(True/False)

Samsung Galaxy M21s स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः स्मार्टफोनला ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आले आहे. दक्षिण कोरियाची कंपनी गॅलेक्सी एम सीरीजचा हा लेटेस्ट फोन आहे. गेल्या महिन्यात भारतात लाँच करण्यात आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ चे रिब्रँडेड व्हर्जन आहे. दोन्ही फोन दरम्यान फरक म्हणजे स्टोरेजचा आहे. जाणून घ्या गॅलेक्सी एम २१ ची किंमत, वैशिष्ट्ये आणि खास फीचर्स संबंधी. वाचाः Samsung Galaxy M21s ची किंमत Samsung Galaxy M21s ची किंमत ब्राझीलमध्ये जवळपास २० हजार ५०० रुपये आहे. हा फोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज मध्ये येते. गॅलेक्सी एफ ४१ ला ६ जीबी रॅम सोबत ६४ जीबी व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आले आहे. याची सुरुवातीची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. गॅलेक्सी एम २१ एस ब्लॅक कलरमध्ये येते. गॅलेक्सी एफ ४१ च्या या रिब्रँडेड फोनला भारतात लाँच करण्याची शक्यता कमीच आहे. कारण, गॅलेक्सी एफ ४१ आधीच भारतात लाँच करण्यात आला आहे. वाचाः Samsung Galaxy M21s ची वैशिष्ट्ये Samsung Galaxy M21s या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस (1080x2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर अक्सिनॉस ९६११ प्रोसेसर दिला आहे. हँडसेटमध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय दिला आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये वाय फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी आणि ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/38iqSWG