Full Width(True/False)

जिओचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान Airtel आणि Vi पेक्षा जास्त बेस्ट, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः प्रीपेड सोबत पोस्टपेड मंथली प्लानमध्ये रिलायन्स जिओचा दबदबा मानला जातो. याचे प्रमुख कारण म्हणजे, Reliance Jio Airtel आणि वोडाफोन-आयडिया (Vi) चे मंथली पोस्टपेड प्लानमध्ये मिळत असलेले फायदे जास्त आहे. तसेच किंमत सुद्धा बाकीच्या दोन्ही कंपन्यासारखीच आहे. रिलायन्स जिओ सोबत एअरटेल आणि व्हीआयच्या ३९९ रुपयांच्या मंथली पोस्टपेड प्लानची वैशिष्ट्ये पाहा. वाचाः रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये युजरला दर महिन्याला ७५ जीबी डेटा बेनिफिट्स सोबत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस मिळतात. तसेच युजर्संना Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे सब्सक्रिप्शन फ्री मध्ये मिळते. वाचाः एअरटेल आणि वोडाफोन-आयडियापेक्षा कसा वेगळा वोडाफोन-आयडिया आणि एअरटेलच्या ३९९ रुपयांच्या मंथली पोस्टपेड प्लानचा विचार केला तर एअरटेलच्या मंथली पोस्टपेड प्लानमध्ये युजर्संना महिन्याला ४० जीबी डेटा सोबत देशात कुठेही नेटवर्वकर अनलिमिटेड कॉलिंग सोबत रोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. एअरटेल युजरला २०० जीबी पर्यंत डेटा कॅरी फॉरवर्ड करता येतो. एअरटेलच्या या प्लानध्ये युजरला केवळ Airtel Xstream चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः वोडाफोन-आयडियाच्या ३९९ रुपयांच्या मंथली पोस्टपेड प्लानमध्ये युजर्संना दर महिन्याला ४० जीबी डेटा सोबत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये युजर्संना Vi Movies आणि Vi TV service ची सुविधा मिळते. वाचाः जिओच्या या प्लानमध्ये मोठी बचत रिलायन्स जिओच्या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये युजर्संना मोठी बचत करता येते. या प्लानमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार चे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. आधी जिओचा फक्त एक पोस्टपेड प्लान होता. १९९ रुपयांचा. परंतु, काही महिन्यापूर्वी JioPostpaid Plus सुरू झाला आहे. ज्यात ३९९ रुपयांपासून १४९९ रुपयांपर्यंत मंथली प्लान आहे. यात युजर्संना वेगवेगळी सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pVCbKZ