नवी दिल्लीः जर तुमच्याकडे रेडमी नोट ९ सीरीजचा प्रो डिव्हाइस असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शाओमीकडून मार्च २०२० मध्ये भारतात लाँच केला होता. ग्लोबल मार्केटमध्ये या फोनचला कंपनीने Redmi Note 9S नावाने आणले होते. Android 10 बेस्ड MIUI 11 सोबत आलेल्या फोनला नुकतेच लेटेस्ट MIUI 12 चे अपडेट देण्यात आले आहे. आता भारतात या फोनला मिळत आहे. वाचाः शाओमीकडून MIUI 12 चे अपडेट भारतात Redmi Note 9 Pro युजर्संला सप्टेंबर महिन्यात दिले होते. यानंतर काही आठवड्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ग्लोबल व्हर्जन Redmi Note 9S साठी अपडेट करण्यात आले होते. तसेच MIUI 12 रोलआउट यासाठी पूर्ण झाले आहे. आता अनेक Redmi Note 9 Pro यूजर्सला भारतात अपडेट मिळत आहे. वाचाः पुढील महिन्यांपर्यंत सर्वांना Android 11 शाओमीच्या मिडरेंज डिव्हाइसला मिळालेले लेटेस्ट अँड्रॉयड ११ बेस्ड अपडेटला बिल्ड नंबर V12.0.1.0.RJWINXM आहे. नवीन अपडेट स्टेबल बीटा स्टेजमध्ये आहे. म्हणजेच आता सिलेक्टेड युजर्सला दिले जाणार आहे. बीटा अपडेट मध्ये सर्व बग्स आणि प्रॉब्लेम्सला फिक्स करण्यासाठी या बिल्ड नंबर सोबत स्टेबल अपडेट सर्व डिव्हाइसेजवर दिले जावू शकते. याचाच अर्थ भारतात रेडमी नोट ९ प्रो युजर्संना डिसेंबर पर्यंत Android 11 अपडेट मिळणार आहे. वाचाः Redmi Note 9 Pro चे फीचर्स स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. हा फोन क्वॉलकॉम स्न्रॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर सोबत येतो. डिव्हाइसमध्ये ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. याला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh ची बॅटरी आणि १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lFJZhk