Full Width(True/False)

Bigg Boss 14: एका रात्रीत 'बेघर' झाले कविता कौशिक आणि निशांत

मुंबई- '' मध्ये दररोज नवनवीन धक्कादायक ट्विस्ट येत आहेत. आता आलेल्या ट्विस्टने तर साऱ्यांनाच चकित केलं आहे. आणि निशांतसिंग मलखानी हे दोन्ही स्पर्धक घरातून बाहेर पडले आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक नाही तर दोघांना बाहेर पडावं लागणार आहे. प्रेक्षकांच्या मतांसोबतच घरातील ग्रीन झोनमध्ये असलेल्या स्पर्धकांचं मतही ग्राह्य धरलं जाणार आहे. यातच कविता आणि निशांत दोघंही घराबाहेर पडल्याची चर्चा आहे. 'बिग बॉस'शी संबंधित माहिती देणाऱ्या 'द खबरी' या अकाउंटवरून कविता आणि निशांतसिंग दोघं आजच्या भागात बाहेर पडणार असल्याचं ट्वीट करण्यात आलं. या दोघांच्या बाहेर पडण्यासाठी जेवढं प्रेक्षकांचं मत आवश्यक होतं तेवढंच घरातील स्पर्धकांनीही त्यांच्या विरोधात मतं दिली. कविता कौशिक आठवड्यापूर्वीच बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री घेऊन आली होती. पण अवघ्या काही दिवसांतच तिने घरात ज्याप्रकारे भांडणं केली त्यानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. जास्मीन भसीनसुद्धा घरातून बाहेर गेल्याची होतेय चर्चा त्याचबरोबर जास्मीनलाही घरातून बाहेर काढल्याचं म्हटलं जात आहे. जेव्हा बिग बॉसच्या घरात मध्यरात्री दोन स्पर्धकांचा घरातील प्रवास संपणार असं सांगितलं जातं. कविता आणि निशांतचं नाव यात समोर आलं तरी जास्मीनलाही घराबाहेर काढण्यात येतं असंही म्हटलं जातं. निशांत स्वतःच्या मतावर ठाम नसतो आणि तो क्षणात आपलं मत बदलतो असं अनेकांना सांगितलं. तर कविताच्या घरात येण्याने घराचं वातावरण अधिक खराब झाल्याचंही म्हटलं गेलं. त्याचवेळी राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी या दोघांनी निशांत आणि जास्मीनचं नाव घेतलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mLSrMm