नवी दिल्लीः विवोचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे. हा फोन ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येतो. कंपनीने या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये ठेवली आहे. फोनला दोन रंगात अॅक्वा मरीन ग्रीन आणि ग्रॅविटी ब्लॅक मध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनचा सेल ३ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. सुरुवातीला या फोनला आकर्षक लाँच ऑफर सोबत उपलब्ध करण्यात येणार आहे. वाचाः Vivo V20 SE चे खास वैशिष्ट्ये फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. ड्यूल सिम सपोर्ट आणि ८ जीबी रॅमच्या या फोनमध्ये क्वॉलकॉ स्नॅपड्रॅगन 665 SoC प्रोसेसर दिला आहे. फोनची इंटरनल मेमरी १२८ जीबी आहे. मेमरीला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा बोके लेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,100mAh बॅटरी दिली आहे. वाचाः ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, एफएम रेडियो आणि यूएसबी टाइप-C पोर्ट यासारखे ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mJo2ya