Full Width(True/False)

या पाच अभिनेत्रींनी प्रेमासाठी आणि लग्नासाठी केलं धर्मांतर

मुंबई- बॉलिवूड स्टार नेहमीच त्यांच्या मुक्त विचारांसाठी ओळखले जातात. प्रेम, लग्न यांसारख्या गोष्टींमध्ये ते वय आणि धर्माची सर्व बंधनं पार करतात. बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी इतर धर्मात जाऊन लग्न केलं आणि आनंदाने तो धर्म स्वीकारलाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत... आराधना, काश्मीर की काली, अॅम इव्हनिंग इन पॅरिस यांसारख्या लोकप्रिय हिंदी सिनेमांत काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री यांनी पतौडीचे नवाब आणि भारतीय क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं. २७ डिसेंबर १९६९ रोजी दोघांचं लग्न झालं. लग्नापूर्वी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव बेगम आएशा सुल्ताना खान असं ठेवलं. सुनील दत्त यांनी 'मदर इंडिया' सिनेमाच्या सेटवर एका अपघातात नर्गिस यांचे प्राण वाचवले. याचकाळात दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्याशी लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलला. दत्त साहेबांशी लग्ना करण्यासाठी त्या फातिमा राशिदच्या नर्गिस झाल्या. अमृता सिंगचा जन्म शिख कुटुंबात झाला. पण जेव्हा ती सैफ अली खानच्या प्रेमात पडली तेव्हा लग्नाच्यामध्ये धर्म आला नाही. सैफसाठी तिने धर्मांतर करण्याचा निश्चय घेतला. सैफचं कुटुंब या लग्नाच्या विरोधात होतं. पण तरीही त्याने १२ वर्षांहून मोठी असलेल्या अमृताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अमृताने लग्नासाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. पण लग्नाच्या १३ वर्षानंतर दोघं वेगळे झाले. अभिनेत्री हेजल कीचने भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगशी लग्न केलं. लग्नानंतर तिने स्वतःचं नाव बदलून गुरबसंत कौर असं ठेवलं. हे नाव तिला संत बलविंदर सिंग यांनी लग्नात दिलं. लग्नापूर्वी हेजल ख्रिश्चन होती. लहान वयात स्टारडम अनुभवलेल्या अभिनेत्री दिव्य भारतीने ९० च्या दशकात आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री अशी तिची ओळख होती. साजिद नाडियाडवालाशी लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36Epqvl