Full Width(True/False)

'महाराष्ट्र सरकारपेक्षा तर आदित्य पांचोली, हृतिक रोशन बरे'

मुंबई- कंगना रणौतने बीएमसी विरोधातला खटला जिंकला आहे. बीएमसीने तिचं कार्यालय तोडलं होतं. यानंतर कंगनाने न्यायालयीन दरवाजे ठोठावले होते. या प्रकरणात न्यायालयाने कंगनाच्या बाजूने निर्णय दिला. आता मुंबईच्या महापौर यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी कंगनाला 'नटी' आणि 'दो टके की' म्हटलं. यावर आता कंगनानेही सोशल मीडियावर आपलं मत मांडलं. महाराष्ट्र सरकारसमोर आदित्य पांचोली आणि चांगले लोक असल्याचं तिला भासत असल्याचं ट्वीट कंगनाने केलं. कंगनाला आदित्य पांचोली चांगला वाटू लागला कंगनाने ट्वीट करत म्हटलं की, गेल्या काही महिन्यात मी महाराष्ट्र सरकारकडून एवढे कायदेशीर खटले, शिव्या, अपमान सहन केला आहे की आता मला बॉलिवूड माफिया, आदित्य पांचोली आणि हृतिक रोशनसारखे लोक चांगले वाटू लागले आहेत. मला माहीत नाही की माझ्यात असं काय आहे की ज्याचा लोकांना इतका राग येतो. महापौर म्हणाल्या 'दो टके के लोग' एक नटी जी हिमाचलमध्ये राहते आणि आमच्या मुंबईला पीओके म्हणते, तिच्याविरोधात तक्रार येते. फारशी किंमत नसलेले लोकही आता न्यायालयाला एक आखाड्याचं स्वरूप देऊ पाहत आहेत जे चुकीचं आहे. हा कोणताही सूड नाहीए. तिने जसं काम केलं, सोशल मीडियावर तिला किती ट्रोल केलं गेलं. आम्ही न्यायालयाचा अपमान करणार नाही. मार्चपर्यंत निश्चित होईल भरपाईची रक्कम गेल्या सप्टेंबरमध्ये बीएमसीने बेकायदेशीर बांधकामाचा हवाला देत मुंबईतील कंगना रणौतच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. नुकसान भरपाईसाठी कंगनाने बीएमसीविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने कंगनाच्या बाजूने निकाल दिला असून महानगरपालिकेने जाणीवपूर्वक चुकीचं काम केल्याचं म्हटलं. यावेळी कंगनाने दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मार्चपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम निश्चित होईल असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37bBkNE