Full Width(True/False)

'या' चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लंडनमध्ये

मुंबई :लॉकडाउन जाहीर झाल्यामुळे अनेकांच्या कामाला ब्रेक लागला होता. मध्ये बराच काळ गेल्यानंतर आता अनलॉकच्या प्रक्रियेत सारं काही हळूहळू सुरू होतंय. मनोरंजनसृष्टीमध्येही कामाला सुरुवात झाली आहे. मालिकांचं रोजचं चित्रीकरण सुरू झालंय. त्याबरोबरच सिनेमांच्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. त्यात मराठी चित्रपटही मागे नाहीत. बऱ्याच मराठी सिनेमांचं चित्रीकरण आता परदेशात होतं. अभिनेत्री ही देखील सध्या लंडनमध्ये तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना झाली आहे.'डेट भेट' या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच लंडन इथं सुरु झालं आहे. या चित्रपटात , सोनाली कुलकर्णी आणि संतोष जुवेकर यांच्या भूमिका असणार आहेत. नावाप्रमाणेच हटके असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन हे करणार असून असून अमेय खोपकर, स्वाती खोपकर निर्माता आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2V5i6ng