मुंबई- भारतातल्या सुपर मॉडेलपैकी एक अशी यांची ख्याती आहे. जेव्हा मिलिंद यांनी २६ वर्षीय अंकिता कोंवरशी लग्न केलं तेव्हा साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या होत्या. २०१८ मध्ये दोघांनी लग्न केलं. सुरुवातीला दोघांनाही अनेकांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला होता. पण आता हेच जोडपं 'कपल गोल्स' देताना दिसत आहे. जेव्हा दोघांनी लग्न केलं तेव्हा मिलिंद ५२ वर्षांचे होते आणि अंकिता २६ वर्षांची होती. आज ४ नोव्हेंबर रोजी मिलिंद त्यांचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. सोशल मीडियावर अंकिताने मिलिंदसाठी फार खास मेसेज लिहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रियकराच्या मृत्यूतून सावरत नव्हती अंकिता अंकिताने एका वेबसाइटल्या दिलेल्या मुलाखतीत मिलिंद सोमण आणि तिच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं. दोघांची पहिली भेट चैन्नईच्या एका हॉटेलमध्ये झाली. एकमेकांशी ओळख झाल्यानंतर दोघं वारंवार एकमेकांना भेटायला लागले. मिलिंद यांना भेटण्यापूर्वी अंकिताच्या प्रियकराचं निधन झालं होतं. या दुःखातून अंकिताला सावरता येत नव्हतं. मिलिंद यांच्या पाठिंब्याने तिला जाणीव झाली की मिलिंदच तिच्यासाठी योग्य साथीदार आहे. अंकिता आपल्या प्रियकराच्या मृत्यूमुळे सावरली नाही अंकिताने एकदा न्यूज पोर्टलला सांगितले आहे की ती मिलिंद सोमणशी कशी भेटली. तिने एअरहोस्टस असल्याचे सांगितले होते आणि त्यांनी मिलिंदला चेन्नईतील हॉटेलमध्ये भेटले. दोघांनाही कनेक्शन वाटले. लवकरच एकत्र वेळ घालवायला सुरुवात केली. अंकिताचा प्रियकर मरण पावला आणि तिला आपला भूतकाळ विसरता आला नाही. मिलिंदच्या समर्थनाने त्याला खात्री दिली की तो आपल्यासाठी योग्य व्यक्ती आहे. अंकिताच्या पालकांना सुरुवातीला आलं होतं टेन्शन अंकिता आणि मिलिंद यांच्या वयातील फरकाबद्दल बोलताना अंकिता म्हणाली होती की, सुरुवातीला जेव्हा तीने घरी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा तिच्या आई- वडिलांना चिंता वाटत होती. पण दोघं एकमेकांसोबत किती आनंदी आहेत हे पाहून आई- वडिलांनी त्यांचं मन बदललं. अंकिताच्या नातेवाईकांमध्येही या नात्याबद्दल अनेक प्रश्न होते. पण ते जेव्हा मिलिंद यांना भेटले ते सारे प्रश्न दूर झाले. मिलिंद अंकिताच्या वडिलांपेक्षा वयाने लहान असले तरी तिच्या आईपेक्षा एका वर्षाने मोठे आहेत. अंकिताच्या आई-वडिलांमध्येही १० वर्षांचा फरक आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32cSrNh