मुंबई: इंटेरिअर डिझायनर यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक यांना अटक करण्यात आल्यानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. काही नेत्यांनी अर्णब यांच्यावर करण्यात आलेली कारवाई योग्य असल्याचं म्हटलं आहे तर अनेक नेत्यांनी अर्णब यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळत आहे. यावर प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते यांनी देखील सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका अमराठी व्यक्तीसाठी मराठी भय्ये नेते का बोंबलत आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. काय म्हणाले महेश टिळेकर? महेश टिळेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, 'एका विधवा मराठी भगिनीला न्याय मिळण्यासाठी अटक करण्यात आलेल्या अमराठी व्यक्तीसाठी महाराष्ट्रातील मराठी भय्ये नेते शिमगा असल्यासारखे का बोंबलत आहेत?' काय आहे प्रकरण? अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्टुडिओच्या इंटेरियर डिझाईनचे काम केले होते. त्यासाठी त्यांना अर्णब यांच्याकडून ५ कोटी ४० लाख रुपये येणे होते. परंतु वारंवार बिल मागूनही गोस्वामी यांच्याकडून पैसे दिले जात नव्हते. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आईने देखील आत्महत्या केली. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळं आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करत असल्याचं नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी केलेल्या तक्रारीनंतर अलिबाग पोलिसांनी ३०६ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. वरळी येथील घरातून त्यांना आज सकाळी ताब्यात घेण्यात आलं. विरोधकांनी केली सरकारवर टीकाअर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजपचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. केंद्रीय नेत्यांबरोबर महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनीही पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनीही ट्विट करत ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तसंच, भाजपा कार्यकर्त्यांना आंदोलनं, उपोषण, मोर्चा आणि सोशल मीडियावर राज्य सरकारविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3oXbTY8