Full Width(True/False)

विवोचा स्वस्त ५जी स्मार्टफोन Vivo S7e लाँच, जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः विवोने अखेर आपला स्वस्त ५ जी स्मार्टफोन लाँच केला आहे. स्मार्टफोनला जबरदस्त फीचर्स सोबत लाँच करण्यात आले आहे. या फोनची किंमत अद्याप उघड झाली नाही. या फोनच्या किंमतीवरून ११ नोव्हेंबर रोजी पडदा हटणार आहे. परंतु, या फोनला अधिकृतपणे लाँच करण्यात आले आहे. ११ नोव्हेंबर पासूनया फोनची विक्री सुरू करण्यात येईल. वाचाः या फोनमध्ये MediaTek Dimensity 720 SoC प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासोबत लाँच केले आहे. यात ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला असून फोनला पॉवर देण्यासाठी 4100mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वनप्लस आणि मोटोरोलाशी टक्कर विवोचा हा फोन 5G सेगमेंटमध्ये एन्ट्री लेवलचा फोन आहे. तसेच नुकताच लाँच करण्यात आलेल्या वनप्लस १० वनसोबत आणि मोटोरोलाच्या नवीन ५ जी फोन सोबत या फोनची टक्कर होईल. आता स्वस्त ५ जी स्मार्टफोनची स्पर्धा सुरू झाली आहे. सर्वच कंपन्या स्वस्त ५ जी फोन बनवून ते आकर्षक किंमतीत विक्री करीत आहे. वाचाः फोनची खास वैशिष्ट्ये विवोचा हा फोन Mirror Black, Silver Moon आणि Phantom Blue कलरमध्ये असलेल्या या फोनला ८ जीबी रॅ प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या एकाच व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. हा फोन अँड्रॉयड १० सॉफ्टवेयरच्या Funtouch ऑपरेटिंग सिस्टम 10.5 वर बेस्ड या फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रीन 1080x2400 पिक्सल आहे. वाचाः ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा विवोच्या या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर सेकंडरी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल मायक्रो सेन्सर आणि तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये 10x digital zoom कॅमेरा फीचर दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l0giXS