Full Width(True/False)

मिलिंद सोमणने मंदिरात जाताना उचलला सगळा कचरा, फोटो व्हायरल

मुंबई- अभिनेते आणि प्रसिद्ध मॉडेल कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच सोशल मीडियावर आपला एक वादग्रस्त फोटो शेअर केल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. आता मिलिंद पुन्हा एकदा नव्या फोटोमुळे चर्चेत आले आहेत. या फोटोत ते रस्त्यावरचाकचरा उचलताना दिसत आहे. मंदिरात जातानाच्या वाटेला मिळालेला कचरा मिलिंद उचलत आहेत. अलीकडेच मिलिंद पत्नी आणि आई उषा सोमण यांच्यासोबत शिव मंदिरात जात होते. दरम्यान, मिलिंद यांनी वाटेवर असणारा प्लॅस्टिकचा कचरा उचलला. त्याच्यासोबत एक फोटोही काढला आणि आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअरही केला. यासोबतच त्यांनी एक सांबलचक पोस्टही शेअर केली. मिलिंद सोमण यांनी फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, 'आज अंकिता आणि आईसोबत शिव मंदिराच्या छोट्या ट्रेकवर गेलो. चालणं जास्त रंजक करण्यासाठी आणि देवाचा सन्मान करण्यासाठी मी वाटेवरचा जेवढा कचरा उचलता येणं शक्य आहे तेवढा उचलला. चौकीदाराने सांगितलं की, कचरा कुंडीत कचरा टाकला तर माकडं येऊन तो कचरा बाहेर फेकतात म्हणून तिथे कचराकुंडी ठेवण्यात आली नाही. साठलेला कचरा जंगलात जाळला जातो.' अभिनेत्याने त्यांच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, 'मुद्दा क्रमांक एक- मला खरोखर वाटतं की आता ती वेळ आली आहे जेव्हा आपण माकडांपेक्षा थोडं हुशार होऊया. मुद्दा क्रमांक दोन- खाद्य कंपन्यांनी प्रत्यक्षात बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग करणं सुरू केलं पाहिजे जेणेकरून जास्त लोक मनात कोणताही दोष न आणता जंक फूड खाऊ शकतात.' मिलिंद सोमण यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अभिनेताच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी त्यांची ही पोस्ट लाइक केली आहे. यासोबतच प्रतिक्रिया देत आपला मतंही मांडलं आहे. मिलिंद सोमण यांनी शेअर केलेल्या पहिल्या फोटोत त्यांच्या दोन्ही हातात कचरा आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये शंकराच्या मंदिरातला फोटो आहे. यासोबतच तिसऱ्या फोटोत मिलिंद त्यांची आई आणि पत्नीसोबत सेल्फी घेताना दिसत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32RtJCy