मुंबई: बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिवाळीचं सेलिब्रेशन करत आनंददायी क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले. अभिनेत्री हिनं देखील तिच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. अंकिताच्या चाहत्यांनी तिला दिवाळीच्या शुभेच्छा देत तिच्या फोटो आणि व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंन्ट्सचा वर्षाव केला. असं असलं तरी सुशांतच्या चाहत्यांनी मात्र अंकिताला ट्रोल केलं आहे. तू इतक्या आनंदात दिवाळी कशी साजरी करू शकतेस? सुशांतला विसरलीस का? सुशांतच्या आठवणी कुठे गेल्या? असे अनेक प्रश्न सुशांतच्या चाहत्यांनी अंकिताला विचारले आहेत. यावर अंकिताच्या चाहत्यांनी देखील तिची बाजू घेत प्रत्युत्तर दिलं आहे. ती काय आयुष्यभर विधवा म्हणून जगणार आहे का? तिला तिचं आयुष्य एन्जॉय करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं अंकिताच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. आणि अंकिता जवळपास सहा वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. २०१६ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. सुशांतच्या निधनानंतर अंकिता पुन्हा चर्चेत आली आहे. तिनं सुशांतच्या मृत्यूचं खरं कारण समोर यावं यालाठी प्रयत्न केले. पंरतु तिच्यावर टीका होऊ लागली. कारण नसतानाही अंकिता सुशांतच्या निधनाचं दु:ख व्यक्त करतेय, त्याची विधवा असल्याचं भासवतेय, असा आरोपही तिच्यावर केला गेला होता. त्यानंतर अंकितानं तिचे आनंदी आणि एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले. विकी जैनसोबतच्या नात्यात फार समाधानी आहे. दोघं लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. विक्की जैनसाठी लिहिलेली पोस्टही आली चर्चेत अंकिताने चाहत्यांनी दिलेल्या कोणत्याच प्रतिक्रियेला उत्तर दिलं नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडे यांनी विकी जैनसाठी एक सुंदर पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. एक पार्टनर म्हणून विक्की कसा आहे हे तिने या पोस्टमध्ये सांगितलं. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताने त्याच्या कुटुंबाचं उघडपणे समर्थन केलं. तो अजूनही सुशांतच्या कुटूंबाशी संपर्कात आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38QyZdm