मुंंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि तिचा नवरा यांचा आनंद सध्या गगनात मावत नाहीए. अमृताने १ नोव्हेंबर रोजी म्हणजे रविवारी सकाळी मुलाला जन्म दिला. रिपोर्ट्सनुसार, पती अनमोल प्रसूतीच्या काळात अमृता रावसोबत ऑपरेशन थिएटरमध्ये हजर होता. अमृता आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. काही दिवसांपूर्वी अमृता राव गरोदर असल्याचं समोर आलं होतं. अमृताला खारमधील एका क्लिनिकच्या बाहेर पाहण्यात आलं होतं. यानंतर अमृताने नवरात्रीदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ती आनंदाने बेबी बंप दाखवताना दिसत होती. या व्हिडिओला कॅप्शन देताना तिने लिहिले होते की, 'नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये नववा महिना सुरू असल्याचा मला आनंद आहे.' अमृता राव आणि अनमोलने सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला कुटुंब आणि फक्त जवळचे मित्र उपस्थित होते. आता लग्नाच्या चार वर्षानंतर अभिनेत्रीने मुलाला जन्म दिला. अमृता रावच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर तिने बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमध्ये शेवटचं काम केलं होतं. या सिनेमात तिने बाळासाहेबांच्यां पत्नी मीना ठाकरे यांची भूमिका साकारली होती. तर सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरेंची भूमिका वठवली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mFCJ5h