Full Width(True/False)

जॉनी लीवर यांचा भारती सिंगला सल्ला, म्हणाले- चूक मान्य करा

मुंबई- ड्रग्ज प्रकरणात कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा यांचं नाव पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. जे लोक भारतीला चांगल्या पद्धतीने ओळखतात त्यांनाही तिच्या घरी गांजा सापडला या बातमीवर सुरुवातीला विश्वास बसला नाही. यासंदर्भात अनेक प्रसिद्ध विनोदवीरांनी आपली प्रतिक्रिया दिली. यांनी भारतीला आपली चूक मान्य करून ड्रग्ज सोडण्याचं वचन देण्यासं सांगितलं. एका मुलाखतीत जॉनी लीवर म्हणाले की, "मी भारती आणि हर्षला फक्त एकच गोष्ट सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हा भारतीय तरुण वर्ग, तुमचे सहकारी आणि वृद्धांनाही अमली पदार्थांचं सेवन करण्याबद्दल सांगा. संजय दत्तकडे पाहा, त्याने जगासमोर आपली चूक मान्य केली. तुम्हाला अजून किती मोठं उदाहरण हवं आहे... स्वतःची चूक मान्य करा आणि ड्रग्ज सोडण्याचं वचन घ्या. या प्रकरणात कोणीही तुम्हाला पुष्पगुच्छ देण्यासाठी येणार नाही.' बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज ट्रेण्जबद्दल जॉनी लीवर यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, 'आता अमली पदार्थांचं सेवन करणं हे दारु पिण्याइतकं सामान्य झालं आहे. जर असंच सुरू राहिलं तर संपूर्ण सिनेसृष्टी खराब होईल. ड्रग्ज घेणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे आणि ते आपलं आरोग्य आणि नाव दोन्ही गोष्टी खराब करतं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे सर्जनशील लोकांसाठी तुरुंग हे योग्य स्थान नाही.' शेअर केला स्वतःचा अनुभव जॉनी लीवर पुढे म्हणाले की, 'मीही दारुच्या अधीन गेलो होतो. पण हे व्यसन आरोग्यासाठी किती अपायकारक आहे हे जेव्हा मला कळलं त्या दिवसापासून मी सावरलो. माझ्या टॅलेन्टवर आणि क्रिएटिव्हिटीवर दारूचा वाईट परिणाम होत होता. याबद्दल कल्याणजी यांनी मला सांगितलं की, जॉनी भाई दारू पिऊ नका.. स्वतःच्या टॅलेन्टमध्येच एवढा नशा आहे की तो करा. यानंतर मी दारूला हात लावला नाही.' यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी राजू श्रीवास्तव म्हणाले की, भारती किंवा तिचा नवरा हर्ष असं काही करू शकतात यावरच माझा सुरुवातीला विश्वास बसला नाही. पण हे सगळं काय आहे.. लोक तुमच्यावर प्रेम करतात, कोट्यवधी लोक तुम्हाला त्यांचे आयडिअल मानतात, तुमचे फोटो त्यांच्या मोबाइलमध्ये जपून ठेवतात, घरात फ्रेम करून लावतात.. मग या गोष्टी करायची काय गरज आहे. असही नाही की अमली पदार्थ घेतल्याने तुम्ही उत्तम कॉमेडी करू शकता किंवा त्याने तुम्हाला ऊर्जा मिळते. या सर्व प्रकरणामुळे मी फार दुःखी आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/396wvI7