मुंबई- गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सिनेमांऐवजी फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे चर्चेत होता. आता संजयने या आजारावर पूर्णपणे मात केली असून त्याने पुढच्या सिनेमांच्या चित्रीकरणालाही सुरुवात केली आहे. दरम्यान, त्याच्या ‘’ सिनेमाचा ट्रेलर नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमात संजय पुन्हा एकदा आपल्या जुन्या शैलीत दिसत आहे. तोरबाज सिनेमात अफगाणिस्तान युद्धाच्या निर्वासित छावणीत राहणाऱ्या मुलांची कथा दाखवण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यात स्वतःचं कुटुंब गमावलेल्यांपैकी संजय दत्त हा एक असतो. संजय सैन्यातील माजी डॉक्टर असून या मुलांना शस्त्राऐवजी क्रिकेटचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतो. मुलांच्या हातात बंदुकांऐवजी तो त्यांच्या हातात बॅट आणि बॉल देतो. पण या सगळ्यात दहशतवादी संघटनेला मुलांना खेळू न देता सुसाईड बॉम्बर बनवायचे आहे. मुलांसाठी दहशतवाद्यांच्या समोर संजय दत्त ठामपणे उभा राहिलेला या ट्रेलरमध्ये दिसत आहे. इथे पाहा सिनेमा ट्रेलर - 'तोरबाज' सिनेमात संजयसोबत आणि राहुल देव यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. गिरीश मलिक दिग्दर्शित हा सिनेमा पुढच्या महिन्यात ११ डिसेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35S0LUQ