Full Width(True/False)

'बालिका वधू' फेम अविका गौर पडली प्रेमात; शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो

मुंबई: ‘बालिका वधू’फेम अभिनेत्री हिनं चाहत्यांना सुखद धक्का दिला. एक खास पोस्ट शेअर करत अविकानं तिच्या आयुष्यातील 'त्या' खास व्यक्तीची सर्वांना ओळख करून दिली आहे. अविकानं ती प्रेमात असल्याचं या खास पोस्टमध्ये म्हटलं आहे. अविकानं बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. असं अविकाच्या प्रियकराचं नाव आहे.रोडीज या शो मधून मिलिंद प्रसिद्धीस आला होता. सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही त्याची ओळख आहे. अविका आणि मिलिंद यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा देखील अविकानं शेअर केला आहे. एका एनजीओच्या वर्कशॉप दरम्यान दोघांची भेट झाली होती. इतक्यात लग्न नाहीअविका आणि मिलिंद यांना प्रेमाची कबूली दिली असली लग्न वैगेरे इतक्यात करायचं नाहीए, असं दोघांनीही त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 'बालिका वधू'मध्ये आनंदीची मुख्य भूमिका करणारी अविका गौर मालिकांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय आहे. बालिका वधूनंतर अविकाच्या वाट्याला फार काही यश आलं नाही. दाक्षिणात्य चित्रपटांमुळे अविका प्रसिद्धीच्या झोतात राहिली. सहकलाकार मनीष रायसिंघानीसोबत अविका रिलेशनशिपमध्ये होती, अशा चर्चा सुरू होत्या.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32BIyci