Full Width(True/False)

Nokia 8000 4G चा नवीन फोटो लीक, डिझाईनची माहिती उघड

नवी दिल्लीः फीचर फोनसंबंधी गेल्या वेळी लीकमधून माहिती समोर आली आहे. फोनची पहिली झलक दाखवली होती. आता आणखी एका लीकमधून फोनची फुल डिझाईन ची माहिती उघड झाली आहे. लेटेस्ट लीक वरून हे स्पष्ट झाले आहे की, Nokia 8000 4G मध्ये आधीच्या व्हेरियंट्स प्रमाणे स्लाइडर डिझाइन नसणार आहे. वाचाः Winfuture ने पुन्हा एकदा नवीन फोनचा फोटो शेयर केला आहे. त्यामुळे असे म्हटले जात आहे की, हा फोटो Nokia 8000 4G चा आहे. या ४ जी फीचर फोनला ग्लॉसी फिनिश सोबत ब्लॅक आणि व्हाइट कलरमध्ये पाहिले जावू शकते. हा बार फॉर्म फॅक्टर आहे. यात की पॅड साठी स्लाइडर कवर आहे. नोकिया ८००० सीरीजच्या जुन्या फोन्समध्ये स्लाइडर डिझाइन खूप प्रसिद्ध होती. Nokia 8000 4G गोल्ड आणि ब्लू कलर मध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. या रिपोर्टमधून सांगितले की, Nokia 8000 4G मध्ये ३डी कर्व्ड सोबत ग्लास डिझाइन दिली जाणार आहे. वाचाः Nokia 8000 4G ची संभावित वैशिष्ट्ये Nokia 8000 4G मध्ये QVGA रेजॉलूशन सोबत २.८ इंचाच एलसीडी डिस्प्ले दिला जाणार आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन २१० क्वॉड कोर प्रोसेसर असणार आहे. हँडसेटमध्ये ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोरेज दिली जात आहे. नोकिया ८००० ४ जी स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. वाचाः Nokia 8000 4G मध्ये २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला जावू शकतो. फोनमध्ये 1500mAh बॅटरी, मायक्रो-यूएसबी पोर्ट, WLAN आणि क्वॉड-बँड GSM कनेक्टिविटी असू शकते. याशिवाय नोकिया आणखी एक फोन नोकिया 6300 4G लॉन्च करू शकते. नोकिया 6300 4G च्या लेटेस्ट लीकवरून माहिती होत आहे की, फोनमध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले आणि सिंगल कोर प्रोसेसर दिला जाणार आहे. या फीचर फोनला चारकोल, स्यान आणि व्हाइट कलरमध्ये आणले जावू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2GS1jjZ