मुंबई: 'बिग बॉस' हिंदीचं १४ वं पर्व सध्या चर्चेत आलं आहे. शोमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धकांनी त्यांच्या आयुष्यातील काही धक्कादायक सिक्रेट्स सांगितली आहेत. ‘बिग बॉस १४’चा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे. ‘इम्युनिटी स्टोन’ मिळवण्यासाठी बिग बॉसकडून जो टास्क देण्यात आलाय त्या टास्कमध्ये घरातील सदस्य त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या तसंच कोणालाही माहित नसलेल्या गोष्टींचा खुलासा करणार आहेत. या टास्कमध्ये रूबीना, अभिनव, एजाज खान, निक्की तंबोली, जास्मीन आणि अली या स्पर्धकांनी त्यांच्या आयुष्यातील सिक्रेट्स जगासमोर उघड केली आहेत. होणार होता घटस्फोट? आणि ही जोडी बिग बॉसच्या घरात दाखल झाली. दोघांमधील केमेस्ट्री आत्तापर्यंत चाहत्यांना आवडते. रुबीनानं अभिनवसाठी करवा चौथचा उपवासही पकडला होता. असं असताना नुकताच रुबीनानं दोघांच्या नात्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. रुबीना आणि अभिनव हे विभक्त होणार होते. नोव्हेंबर महिन्यातच दोघांचा घटस्फोट देखील होणार होता. परंतु बिग बॉसची ऑफर आल्यानंतर दोघांनीही नात्याला एक संधी द्यायचं ठरवलं. बिग बॉसच्या निमित्तानं आम्ही एकत्र राहता आलं, असं रुबीना म्हणाली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2JsQ02Q