Full Width(True/False)

मोटोरोला स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर, मोठ्या डिस्काउंटवर खरेदीची संधी

नवी दिल्लीः फेस्टिव सेल दरम्यान मोटोरोलाचा स्मार्टफोन खरेदी करता आला नसेल तर तुमच्यासाठी आता एक गुड न्यूज आहे. आता शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सेल आणि डिस्काउंट्सचा राउंड सुरू होत आहे. मोटोरोलाकडून प्रसिद्ध डिव्हाइसेजवर मोठा डिस्काउंट यावेळी दिला जाणार आहे. कंपनी प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रसिद्ध स्मार्टफोन्सवर डिस्काउंट देत आहे. वाचाः ८ नोव्हेंबर पासून फ्लिपकार्टवर सुरू होणाऱ्या या सेलमध्ये Moto Razr ला सिलेक्टेड बँक कार्ड्टसवर खरेदी केल्यास १० हजार रुपयांपर्यंत तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. या डिस्काउंटनंतर फोन ७४ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकतो. मोटोरोला ज्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट ऑफर करीत आहे. त्यात बजेट स्मार्टफोन्सपासून मिडरेंज फोनपर्यंतचा समावेश आहे. या सेल दरम्यान Moto G9 ला 9,999 रुपये आणि One Fusion+ ला 16,499 रुपायंत खरेदी करता येवू शकते. वाचाः Moto E7 Plus ला बायर्स 8,999 रुपयांच्या डिस्काउंटेड प्राइस वर खरीद करू शकतील. कंपनीची फ्लॅगशिप Moto Edge+ सेल मध्ये 64,999 रुपयात खरेदी करता येवू शकते. जर तुम्ही फ्लिपकार्ट मेंबर आहात तर तुम्हाला बिग दिवाली सेलचे अॅक्सेस ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून मिळेल. मोटोरोला कडून इंडियन मार्केटमध्ये लवकरच नवीन डिव्हाईसेज बाजारात उतरवले जावू शकतात. वाचाः लाँच केले दोन नवीन फोन मोटोरोला भारतात लवकरच आपले नवीन फोन लाँच करू शकतो. कंपनीने यूरोपमध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स Moto G9 Power आणि Moto G 5G लाँच केले आहेत. Moto G9 Power ला मिडरेंज सेगमेंटमध्ये आणले जावू शकते. याची किंमत यूरोपमध्ये १८ हजार रुपये आहे. याशिवाय Moto G 5G ची किंमत भारततात २५ हजारांच्या जवळपास असू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p6KVxd