Full Width(True/False)

LG ने लाँच केले भारतात तीन जबरदस्त स्मार्टफोन, किंमत ९४९० ₹ पासून सुरू

नवी दिल्लीः एलजी एलेक्ट्रॉनिक्सकडून भारतात W-सीरीजचे तीन नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहे. कंपनीने , आणि LG W31+ आणले आहे. या तीन फोनला बजेट सेगमेंटमध्ये उतरवले आहे. अपग्रेडेड W-सीरीज मॉडल्स जबरदस्त कॅमेरा, मोठी बॅटरी, मोठा डिस्प्ले सोबत लाँच करण्यात आले आहे. LG W11, आणि LG W31+ तिन्ही फोनला सिंगल कलर ऑप्शनमध्ये उतरवले आहे. वाचाः LG W11, LG W31 आणि LG W31+ ची किंमत नवीन डब्ल्यू सीरीजच्या स्मार्टफोन्सला भारतात नोव्हेंबर पासून विक्री करण्यात येणार आहे. तसेच सिग्नेचर कलर मिडनाइट ब्लू मध्ये खरेदी करता येवू शकते. LG W11 ची किंमत ९ हजार ४९० रुपये ठेवण्यात आली आहे. तर LG W31 ची किंमत १० हजार ९९० रुपये आणि LG W31+ ची किंमत ११ हजार ९९० रुपये ठेवली आहे. या तिन्ही स्मार्टफोन्सला वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज मध्ये खरेदी करता येवू शकते. वाचाः LG W11, LG W31 आणि LG W31+ चे वैशिष्ट्ये कंपनीने तिन्ही नवीन स्मार्टफोन्स ६.५२ इंचाचा फुल व्हिजन डिस्प्ले सोबत लाँच केले आहे. या तिन्ही फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम सोबत 2GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळतो. LG W11 मध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. LG W31 मध्ये ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज दिला आहे. तर LG W31+ मध्ये ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. वाचाः LG W11 मध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सरचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर LG W31 आणि W31+ मध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल लेन्सचा ट्रिपल कॅमेरा मिळतो. तिन्ही फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3541B0s