मुंबई- सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. दरम्यान, तिने घर आणि घरातील आठवणींशी संबंधित अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. हंगामाच्या पहिल्या हिमवृष्टीनंतर कंगनाने तिच्या मनालीतील घराचे फोटो सुंदर कॅप्शनसह चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. बर्फाच्या पांढऱ्या शुभ्र चादरीने आच्छाजलं गेलं कंगनाचं घर कंगनाने फोटो पोस्ट करत लिहिले की, होम केअरटेकरकडून काही फोटो मिळाले. आज सकाळी मनालीतली ही पहिली बर्फवृष्टी आहे. कंगनाचं घर बर्फाने आच्छादलं गेलेलं होतं. हे दृष्य फारच नयनरम्य असं होतं. कंगनाने शेअर केले मनालीच्या घरचे फोटो मनालीमध्ये कंगनाचा एक अतिशय सुंदर बंगला आहे. तिच्या घरातून पर्वतरांगा दिसतात. कंगनाचं हे घर समुद्रसपाटीपासून जवळपास २ हजार मीटर उंचीवर आहे. कंगना तिच्या फावल्या वेळेत आवर्जुन या घरी रहायला येते. तिच्यासाठी हे एक विश्रांतीचं आणि पार्टीचं घर आहे. कंगनाने मेहनतीने आपलं हे घर बनवलं आहे. या घरी तिचे काही कौटुंबिक फोटो, जुन्या शाली, हाताने रंगविलेल्या लाकडी वस्तू,तसेच घरात अनेक कोरिव कामही केलं आहे. घरापासून दूर शूटिंगमध्ये व्यग्र आहे कंगना कंगना 'थलायवी' आणि 'धाकड' या दोन सिनेमांच्या चित्रीकरणात सध्या व्यग्र आहे. नुकतंच तिचा भाऊ अक्षतचं लग्न झालं. कंगनाने बराचसा वेळ कुटुंबियांसोबत घालवला आणि घरातील प्रत्येक आनंदाची गोष्ट तिने चाहत्यांसोबत शेअर केली. चित्रीकरणासाठी घरापासून लांब जाताना तिने पुतणा पृथ्वीशी झालेलं संभाषणही सोशल मीडियावर शेअर केलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mbykqT