Full Width(True/False)

भडकली नुसरत जहां, म्हणाली- 'लव- जिहाद एकत्र येऊच शकत नाहीत'

मुंबई- प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसची लोकसभेचे खासदार हिने कथित लव जिहादवरून राजकारण केल्याबद्दल धार्मिक कट्टरपंथीयांवर जोरदार टीका केली आहे. आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी धर्म हा राजकीय मुद्दा जाणीवपूर्वक बनवला जात असल्याचं नुसतर म्हणाली. नुसरत स्वतः मुस्लिम असून तिने हिंदू धर्मात लग्न केलं आहे. तिच्या लग्नाच्यावेळी कट्टरवादीयांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता. ''बद्दल बोलताना बशीरहाटची खासदार म्हणाली की, 'लव' आणि 'जिहाद' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. ती पुढे म्हणाली की कोणासोबत राहायचे आहे आणि कोणाशी लग्न करायचं आहे, हा धार्मिक नाही तर पूर्णपणे वैयक्तिक मुद्दा आहे. नुसरत जहांच्या मते, 'प्रेम ही एक अतिशय वैयक्तिक गोष्ट आहे. प्रेम आणि जिहाद एकत्र येऊच शकत नाहीत. निवडणुकांना सुरुवात होण्यापूर्वी असे विषय डोकं वर काढतात. कोणासोबत राहायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एकमेकांवर फक्त प्रेम आणि प्रेमच करा. धर्माला राजकारणाचं साधन बनवू देऊ नका.' नुसरत जहांने व्यावसायिक निखिल जैनशी लग्न केलं आहे. मुस्लिम असूनही कुंकू आणि मंगळसूत्र घातल्याबद्दल आणि दुर्गापूजेमध्ये भाग घेतल्याबद्दल मुस्लिम कट्टरपंथीयांकडून नुसरत विरोधात जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर नुसरतने मुस्लिम कट्टरपंथीयांना चोख प्रत्युत्तर दिलं होतं. एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वी देवी दुर्गाच्या अवतारात फोटोशूट केल्यामुळेही सोशल मीडियावर तिला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. तिला जीवे मारण्याची धमकीही मिळाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/372llkV