Full Width(True/False)

राहुल वैद्य झाला भावुक, निक्की तांबोळीने पॅन्टमध्ये लपवला मास्क

मुंबई- 'बिग बॉस' च्या घरात नुकतात नॉमिनेशन टास्क करण्यात आला. यात निक्की तांबाळी आणि हे दोन स्पर्धक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पण निक्कीने प्रामाणिकपणे हा खेळ न खेळता टास्कमध्ये वापरण्यात येणारा मास्क आपल्या पॅन्टमध्ये लपवला. तिच्या या कृतीमुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. राहुलसह इतर स्पर्धकांनीही तिची निंदा केली आणि तिला खडे बोल सुनावले. दरम्यान टीव्ही स्टार देवोलीना भट्टाचार्य आणि जय भानुशाली यांनीही निक्की तांबोळीची ही कृती अत्यंत चुकीचं असल्याचं म्हटलं. देवोलिनाने ट्वीट करत निक्कीला मूर्ख म्हटलं. तिने पुढे लिहिलं की, 'चीप हा एकच शब्द मुर्ख निक्की तांबोळीला लागू होतो. बिग बॉस अशा लोकांना डोक्यावर बसवू नका. हे मनोरंजन तर नक्कीच नाही. राहुल वैद्य तू असाच धैर्याने खेळ.' जय भानुशालीने निक्की तांबोळीची तुलना 'बिग बॉस १०' मधील स्पर्धक स्वामी ओमशी केली. त्याने ट्वीट करत म्हटलं की, ' ही यावर्षीच्या बिग बॉसची स्वामी ओम आहे. अगदीच निरर्थक आहे. मला राहुल वैद्यचा अभिमान आहे. तो उत्तम खेळत आहे. मला त्याच्यात एक विजेता दिसत आहे.' 'बिग बॉस १०' मध्ये स्वामी ओमने बानी जे वर फेकली होती लघवी 'बिग बॉस १०' मध्ये स्वामी ओमने एका टास्कमध्ये एका वाडग्यात लघवी केली आणि तीच लघवी स्पर्धक बानी जे च्या अंगावर फेकली. यानंतर घरातील सर्व सदस्य स्वामी ओमच्या विरोधात उभे राहिले. या घटनेनंतर त्याला बिग बॉसच्या घरातून काढून टाकण्यात आलं. निक्कीने पॅन्टमध्ये मास्क लपवल्यानंतर राहुलने तिला गलिच्छ वागणुक असल्याचं सांगितलं तर नयना सिंहने मुलींच्या इज्जतीचा तरी विचार कर असं उत्तर दिलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/389HHTL