Full Width(True/False)

आधी नयनतारासाठी सोडलं पत्नीला, आता करतोय भाचीशी दुसरं लग्न?

बॅकग्राउंड डान्सर म्हणून प्रभू देवाने सिनेकरिअरला सुरुवात केली. आज तो प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता झाला आहे. कामाशिवाय प्रभू देवा त्याच्या खासगी आयुष्य आणि अफेअरमुळे अधिक चर्चेत राहीला. आज आम्ही तुम्हाला त्याच्या आयुष्यातील एक अशी घटना सांगणार आहोत ज्यामुळे त्याचं खासगी आयुष्य पुरतं बदलून गेलं. प्रभू देवाने १९९५ मध्ये लताशी लग्न केलं. लता आणि प्रभू देवाला तीन मुलं होती. पण २००८ मध्ये मुलगा विशालचं कर्करोगाने निधन झालं. मुलाच्या जाण्याने प्रभू पुरता कोसळून गेला होता. यातच त्याच्या आयुष्यात नयनतारा आली. प्रभू देवाच्या आयुष्यात नयनतारा आली आणि हळूहळू सर्व गोष्टी बदलू लागल्या. गोष्टी इतक्या बदलल्या की प्रभू देवाने पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2IDOhHe