Full Width(True/False)

ओटीटीवर आता ‘वॉच’; वयोमर्यादा लागू होण्याची शक्यता

० नव्या नियमलावलीची उत्सुकता मुंबई टाइम्स टीम ओटीटीवर () वर येणार का? यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. सरसकट सेन्सॉरशिप लागू होऊ नये या दृष्टीनं १५ प्लेअर्सनी एकत्र येऊन स्वनियंत्रण नियमावली मान्य केली होती. पण, केंद्र सरकारनं ओटीटीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे ओटीटीवरील आशयावर केंद्र सरकारचा अंकुश असेल. यापुढे ओटीटी प्लॅटफॉर्म्स माहिती आणि प्रसारण खात्याच्या अधिपत्याखाली येतील. त्यामुळे प्लॅटफॉर्म्सवरील आशयावर मर्यादा येतील. आता नवी नियमावली काय असेल याकडे ओटीटी प्लेअर्सचं लक्ष लागलं आहे. लॉकडाउनच्या काळात मनोरंजनाची इतर माध्यमं ठप्प झाल्यामुळे ओटीटीचं प्रस्थ अधिक वाढलं. लॉकडाउनच्या काळात सुमारे ५० ते ५५ सीरिज प्रदर्शित करण्यात आल्या. त्याबरोबर काही चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित केले जात आहेत. भडक आणि अश्लील दृश्यं आणि बिनधास्त भाषेचा वापर यामुळे हे माध्यम चर्चेचा विषय ठरलं होतं. ओटीटीवर येणाऱ्या आशयावर अंकुश आणण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न केले जात होते. काही दिवसांपूर्वी स्वनियंत्रण नियमावलीचा पर्याय आजमावून पाहण्यात आला. ही नियमावली सर्वसमावेशक नाही अस सांगत नवी नियमावली तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, त्याआधीच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ० ओटीटीवरील चित्र काय? - कुठलीही बंधनं नसल्यामुळे भडक आणि अश्लील दृश्यांचा भडिमार - ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर लॉग इन करताना वयोमर्यादा नव्हती. - काही वेळा कथेची गरज नसताना बोल्ड दृश्यं - पायरसीचं वाढलेलं प्रमाण ओटीटीवरील आशयावर नियंत्रण येणार असून, काही गोष्टींवर मर्यादा येतील. कशा स्वरुपाची नियमावली बनवण्यात येईल, यावर पुढच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. अर्थात, काही मर्यादा ओलांडल्या गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर माध्यमांपेक्षा वेगळी नियमावली असेल अशी आशा आहे. कारण इतर माध्यमांप्रमाणे ओटीटी हे माध्यम सर्वांकडून पाहिलं जाणारं नाही. आता या माध्यमाकडे गांभीर्यानं बघितलं जाईल. - अभिषेक वकील, रिजनल कन्टेंट हेड, एमएक्स प्लेअर आशय पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी वयोमर्यादा लागू होईल. चित्रपटांप्रमाणे मूल्यांकन होईल असं वाटतं. भडक दृश्य आणि भाषेसंबंधी निमय येतील. पण, ओटीटी प्लेअर्स स्मार्ट आहेत. ते सुरक्षित खेळी खेळतील. - आदीश केळुस्कर, दिग्दर्शक मनोरंजनांच्या इतर माध्यमांप्रमाणे नियम लावण्यात आले, तर ती माध्यमं आणि ओटीटीमध्ये काहीच फरक राहणार नाही. प्रेक्षकसंख्येवर याचा परिणाम होईल. वास्तववादी चित्रण करताना अडथळे येतील. पण, अश्लील दृश्य दाखवून आर्थिक नफा मिळवणाऱ्यांना चाप लागेल. नियमावली काय असेल यावरुन पुढची गणितं ठरतील. - कार्तिक निशाणदार, निर्माता ओटीटीवर येणाऱ्या आशयावर अंकुश ठेवणं गरजेचं होतं. यावर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी उचललेलं हे सरकारचं पहिलं पाऊल असावं. फक्त या माध्यमावरील नियंत्रणाची पद्धत सेन्सॉर बोर्डासारखी नसावी. तिथे फक्त चित्रपटासंबंधी लोक असतात. ओटीटीच्या बाबतीत नियामक प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असावा. म्हणजे त्यात आशय निर्माण करणारेही असावेत आणि ज्यांच्यासाठी तो आशय निर्माण केला जातोय अशांचे प्रतिनिधीही असावेत. तरच एखाद्या कलाकृतीकडे बघण्याचे विविध दृष्टिकोन कळतील. आशय निर्माण करणारे ग्राहकांचा विचार न करता केवळ त्यांच्याच दृष्टिनं विचार करतात. विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर 'किड्स' हा पर्याय असला, तरी मुलं विविध ठिकाणी आणि माध्यमातून तो बघत असतात. सरकारनं ढोबळ विचार न करता अशा सर्व बाजूंचा विचार करावा. - उन्मेष जोशी, रिस्पॉन्सिबल नेटीझम


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kohoM6