मुंबई: धार्मिक कारणांसाठी सिनेसृष्टीपासून दूर झाल्यानंतर हिनं आणखी एक धक्का दिला. तो म्हणते तिनं गुजरातमधील याच्यासोबत लग्न केलं. सुरत इथं दोघांचं लग्न झालं. सना आणि तिचा नवरा मुफ्ती यांच्या लग्नाचे व्हिडिओ , फोटो व्हिडिओ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सनानं पहिल्यांदाच मौलाना मुफ्ती अनससोबतचा फोटो शेअर केला आहे. सनानं लाल रंगाचा लेहंगा परिधान केली असून अनसनं पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे. या फोटोला सनानं एक कॅप्शन दिलं असून हे कॅप्शनही चर्चेत आहे.'अल्लाहसाठी आम्ही एकमेकांवर प्रेम केलं. अल्लाहसाठी केला. या जन्मात अल्लाहचा आशिर्वाद आम्हाला एकत्र ठेवेल आणि स्वर्गात पुन्हा आम्ही एकमेकांना भेटू असं सनानं तिच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेताना सनाने सोशल मीडियावर लिहिलं होतं की, 'मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीचं आयुष्य जगत आहे आणि या काळात प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मला प्रसिद्धी, सन्मान आणि संपत्ती सर्व काही मिळाले. ज्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे.' सनानं पुढं लिहिलं की, 'एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात हा विचार येऊ ने का की त्याला कधीही मरण येऊ शकतं आणि मरणानंतर त्याचं काय होईल? या दोन प्रश्नांची उत्तरं मी अनेक काळापासून शोधत आहे. विशेषतः मृत्यूनंतर माझं काय होईल याबद्दल मी अधिक विचार करते.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2UMPCyj