मुंबई: भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी () यांनी अलीकडेच गायलेल्या एका गाण्यावरून सध्या चर्चा सुरू आहेच. अमृता यांच्या गाण्याची तुलना गायी-म्हशीच्या हंबरण्याशी करणारे निर्माते-दिग्दर्शक () यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. तर या सर्व प्रकरणाला आता राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून येत आहे. अमृता फडवणीस यांच्या गाण्यासंदर्भात पोस्ट शेअर केल्यानंतर महेश टिळेकरावंर नेटकऱ्यांनी निशाणा साधला. इतकंच नाही तर टिळेकर यांचे काही पोस्ट शेअर करत याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला उत्तर देताना टिळेकर यांना एक पोस्ट शेअर करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडिवर तुफान व्हायरल होत आहे. महेश टिळेकल यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली,पण यामागे पवार कुटुंबाचा, शिवसेनेचा हात आहे; अशी चर्चा सुरू असताना टिळेकर यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे काही फोटोही व्हायरल झाले. यासर्व प्रकारावर टिळेकरांनी त्यांच्या पोस्टमध्ये भाष्य केलं आहे. तसंच त्यांनी भाजप नेते यांच्या सोबतचे फोटो शेअर करत खोचक शब्दात त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे. इतकंच नाही तर अमृता फडणवीस यांच्यासंदर्भात केलेली पोस्ट काहीही केलं तरी डीलिट करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काय आहे टिळेकरांची पोस्ट? काय आहे वाद? महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर अमृता या गायिका म्हणून पुढं आल्या होत्या. त्यांनी त्यावेळी काही गाणीही गायली होती. नुकतंच त्यांचं एक नवं गाणं यू ट्यूबवर प्रदर्शित झालं आहे. 'तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या' असे या गाण्याचे बोल आहेत. अमृता यांच्या या गाण्यावर डिसलाइक्सचा पाऊस पडला होता. दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी तर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. 'लोक एक वेळ गायी-म्हशींचं हंबरणं सहन करतील पण हा आवाज सहन करणं अशक्य आहे. जिचा आवाज ऐकला की कानाचे पडदे फाटण्याची भीती निर्माण होते, लाखो तरुणांच्या हृदयात धडकी भरते अशी एक आपल्याच विश्वात धुंद होऊन गाणारी विश्वगायिका लोकांना सातत्याने का छळत आहे?,' असा प्रश्न त्यांनी केला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3foVVll