मुंबई: अभिनेत्री हिची मुख्य भूमिका असलेल्या '' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या या ट्रेलरवर आणि भूमीच्या या चित्रपटातील भूमिकेवर कौतुकाचा वर्षाव होतोय. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भागमती' या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात भूमी एका आयएएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. मात्र चित्रपटाची कथा अतिशय गूढ आणि थराराने परिपूर्ण असल्याचं ट्रेलरमध्ये दिसतंय. चंचल चौहान असं भूमीच्या भूमिकेचं नाव असून तिच्याभोवतीच चित्रपटाची कथा फिरते. सत्ता आणि पैसा अशा दोन्ही गोष्टी हातात असलेल्या देशातील मोठ्या व्यक्तींच्या कटामध्ये ती आरोपी ठरते आणि त्यानंतर एका पडक्या वाड्यात तिची चौकशी केली जाते. त्या चौकशीदरम्यान त्या वाड्यात कोणकोणत्या गोष्टी घडतात आणि चंचलची दुर्गामती कशी होते याची रंजक कथा चित्रपटात पाहायला मिळेल. चित्रपटात भूमीशिवाय अर्शद वारसी, माही गिल, करण कपाडिया आणि जिशू सेनगुप्ता यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'भागमती'चे दिग्दर्शक जी अशोक यांनीच 'दुर्गामती'चं दिग्दर्शन केलं आहे. येत्या डिसेंबर महिन्यात अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mkwbsS