Full Width(True/False)

अमेरिकेतल्या संरक्षण मंत्रालयातील ऑफर धुडकावली; तनुश्री दत्ता करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक

मुंबई :अभिनेत्री मधल्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात सुरू झालेल्या 'मीटू' चळवळीदरम्यान बरीच चर्चेत होती. तिचा स्पष्टवक्तेपणा, बिनधास्तपणा सर्वांनाच माहीत आहे. तनुश्री मधल्या काही वर्षांत बॉलिवूडपासून दूर होती. ती इथे पुन्हा आली. पण चित्रपटांपेक्षा ती वेगळ्या कारणांसाठीच चर्चेत राहिली. आता मात्र तिनं करायचं ठरवलंय. तनुश्री भारतात पुन्हा आल्यावर तिच्या दिसण्यावर, वजनावर बरीच टीका केली गेली. त्यावरही तिनं वेळोवेळी उत्तर दिलं आहे. आता तर तिनं ते कृतीत आणलंय. मनोरंजनविश्वात परत सक्रिय होण्यासाठी तिनं १५ किलो वजन कमी करून दाखवलंय. ती सध्या तीन मोठ्या बजेटच्या दाक्षिणात्य चित्रपटकर्त्यांच्या संपर्कात असून लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणा करणार आहे. तर काही कास्टिंग एजन्सीबरोबरही तिचं बोलणं सुरू आहे. तसंच वेब सीरिजसाठीही तिचा विचार केला जातोय. याबाबतची माहिती तिनं सोशल मीडियावर एका मोठ्या पोस्टमध्ये दिली आहे. '' या चित्रपटापासून स्टार झालेली तनुश्री पुन्हा एकदा अभिनयाची चमक दाखवायला सज्ज झाली आहे. तिच्या पुनरागमनाच्या बातमीनं तिचे चाहते सुखावले आहेत. संरक्षण मंत्रालयातील एक ऑफर धुडकावली तनुश्रीनं अमेरिकेतली चांगली नोकरी सोडली आहे. इतकंच नाही तर अमेरिकेतल्या संरक्षण मंत्रालयातील एक ऑफर धुडकावून लावली आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रिकरणावेळी नाना पाटेकर यांनी विनयभंग केल्याचा जाहीर आरोप तनुश्रीने गेल्या वर्षी जागतिक 'मी-टू' मोहिमेच्या निमित्ताने केला होता. तनुश्रीनं लैंगिक शोषणाच्या प्रकाराला वाचा फोडल्यानंतर बॉलिवूडमध्ये 'मीटू' चळवळ सुरू झाली होती. अनेक अभिनेत्रींनी पुढं येऊन स्वत:वरील अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या. यावरून बॉलिवूडमध्ये दोन गट पडले होते. तनुश्रीलाही सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं. 'मीटू'चे वादळ शमल्यानंतर ती अमेरिकेला निघून गेली होती. मात्र, तिनं पुन्हा बॉलिवूडमध्ये परतावं, अशी इच्छा तिची बहिण इशितानं व्यक्त केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nq5oMb