Full Width(True/False)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी होणार कर्जतकर; फार्महाऊस घेण्याच्या तयारीत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री लवकरच कर्जतकर होणार आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना? म्हणजे, शिल्पा लवकरच कर्जतमध्ये एक शेतघर (फार्महाऊस) घेण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच या निमित्तानं फार्महाऊस पाहण्यासाठी ती कर्जतला आली होती. त्यावेळी एका वडापावच्या गाडीवर तिनं गरमागरम वडापाव-कांदाभजीचा आस्वाद घेतला. तसा व्हिडीओही तिनं सोशल मीडियावर शेअर केला होता. तो खूप व्हायरल झाला. बॉलिवूडच्या अनेक तारे-तारकांची मुंबईच्या जवळपासच्या भागात शेतघरं (फार्महाऊस) आहेत. या सिनेस्टार्सची तिथे नेहमी ये-जा असते. अभिनेत्री शिल्पा शेट्टीही कर्जत परिसरात शेतघर विकत घेण्यास उत्सुक आहे. तिनं आतापर्यंत कर्जतमधील ७-८ फार्महाऊस बघितले आहेत. ते पाहण्यासाठी शिल्पा आपली आई सुनंदा शेट्टीसह पुन्हा एकदा कर्जतमध्ये येऊन गेली. शिल्पाला ते आवडलं आणि तिचा होकार आला तर ती लवकरच कर्जतकर होऊ शकेल. शिल्पा शेट्टी तिच्या 'हंगामा- २ट या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे. मनालीमध्ये याचं निम्मं शूटिंग पार पडलं. त्यानंतर मुंबईमध्येही या चित्रपटाचं शूटिंग होणार आहे. प्रणिथा सुभाष, शिल्पा शेट्टी, परेश रावल, राजपाल यादव, मनोज जोशी, जॉनी लिव्हर, शक्ती कपूर असे अनेक नामवंत कलाकार या चित्रपटात अभिनय करत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33663dZ