मुंबई: ही काही ना काही करणांमुळं चर्चेत असते. कधी ती एखादं बेधडक वक्तव्य करते, तर कधी एखादा व्हिडिओ निमित्त ठरतो. राखी तिच्या खास अंदाजामुळं चर्चेत राहत असली तरी तिची भूतकाळ मात्र, फार वेगळा आणि संघर्षमय होता. एका शोदरम्यानं तिनं तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. राखी सावंत या नावानं तिला सध्या आपण ओळखत असलो तरी, तिचं खरं ना हे खूप कमी जणांना माहित आहे. राजीव खंडेलवाल याच्या 'जज्बात' शोमध्ये राखी सहभागी झाली होती. याशोमध्ये राखीचं खरं नाव समोर आलं होतं.राजीव राखीचं स्वागत करताना 'आज या शोमध्ये कोणतीच कॉन्ट्रोव्हर्सी होणार नाही. कारण मी आज राखी सावंतशी नाही तर निरू भेडा हिच्याशी बोलणार आहोत', असं म्हणतो स्वतःचं मूळ नाव ऐकून राखी थोडी बावचळते आणि नंतर ती मीच आहे असं सांगते. यानंतर राजीव राखीला तिच्या बालपणाबद्दल विचारतो. बालपण होतं खडतर 'बालपण आठवलं तरी अंगावर काटा येतो, माझे हात पाय कापतात. आम्ही फार गरिबीतून वर आलो आहोत. गरोदर असताना माझ्या आईनं दगड, विटांवर स्वयंपाक केला आहे. आई सांगायची की, जेव्हा आमच्याकडं खायला काही नसायचं तेव्हा बाजूच्यांनी फेकलेलं अन्न आम्ही खायचो. माझी आई एका रुग्णालयात आया म्हणून काम करायची.' यानंतर राखी ओक्साबोक्शी रडू लागली. सतत लाइमलाइटमध्ये राहणं ही भल्याभल्यांना न जमणारी गोष्ट राखीनं सहज करून दाखवलीय. तिच्याविषयीच्या उलटसुलट बातम्यांमुळं लोकांमध्ये तिच्याविषयी 'लव्ह अँड हेट' रिलेशन तयार झालंय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2V4AFbm