Full Width(True/False)

एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून सना खानने केला मौलानाशी निकाह

सुरत- पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. २० नोव्हेंबरला तिने सुरतस्थित मौलवी मुफ्ती अनसशी लग्न केलं. दरम्यान महिन्याभरापूर्वी तिने धर्मासाठी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिने नुकताच लग्नानंतरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात तिने लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. तर पतीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला आहे. हा फोटो शेअर करताना तिने खास मेसेजही लिहिल आहे. अल्लाहला डोळ्यासमोर ठेवून केलं लग्न या मेसेजवरूनच सनाने लग्न नक्की कोणती गोष्ट लक्षात घेऊन केलं याचा अंदाज येतो. सनाच्या निकाहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर तिचे लग्नाचे अनेक फोटोही समोर आले. सनाने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पतीसोबतचा फोटो शेअर केला. नवरीच्या जोड्यात सना खूप सुंदर दिसते. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, 'अल्लाहसाठी एकमेकांवर प्रेम केलं... अल्लाहसाटी एकमेकांशी लग्न केलं. आम्हाला या जगात आणि स्वर्गात एकत्र ठेवेल.' महिन्याभरापूर्वी बॉलिवूडला केलं अलविदा सना खानने २० नोव्हेंबरला रात्री सूरतमधील मुफ्ती अनसशी लग्न केलं. लग्नावेळी तिने संपूर्ण पांडऱ्या रंगाचा पोशाख घातला होता. त्यावर पांढऱ्या रंगाचाच हिजाबही होता. लग्न झाल्यानंतर वधू- वरांनी केकही कापला. केक कापतानाचा एक व्हिडिो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ऑक्टोबर महिन्यात सनाने धर्मासाठी बी- टाउन कायमचं सोडण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना तिने लिहिले की, 'मी मानवतेच्या आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचं ठरवलं आहे.' सना खानने 'जय हो', 'टॉयलेट एक प्रेम कथा', 'धन धना धन गोल' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. मॉडेलिंगसह तिने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे. यासोबतच 'बिग बॉस', 'झलक दिखला जा' आणि 'फिअर फॅक्टर' यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/398rMFW