Full Width(True/False)

कॉमेडियन राजीव निगम यांच्या नऊ वर्षांच्या मुलाचं आकस्मिक निधन

मुंबई- प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आणि अभिनेते यांच्या नऊ वर्षीय मुलाचं देवराजचं निधन झालं. स्वतः राजीव यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. काल ८ नोव्हेंबर रोजी राजीव यांचा वाढदिवस होता. वाढदिवसालाच त्यांच्या मुलाने अखेरचा श्वास घेतला. मुलाच्या जाण्याच्या दुःखातून राजीव सावरू शकले नाहीत. मुलाच्या मृत्यूने राजीव यांच्या घरात शोककळा पसरली आहे. मुलाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत राजीव निगम यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केला. यात त्यांनी लिहिले की, 'माझ्या वाढदिवसाला हे कसलं गिफ्ट तू मला दिलंस. आज माझा मुलगा देवराज आम्हाला सोडून गेला. वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वीच तो गेला.' देवराज अनेक वर्ष आजारी होता. २०१८ मध्ये त्याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे को काही दिवस आयसीयूमध्येही राहिला होता. या काळात राजीव यांनी मुलगा लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन चाहत्यांना केलं होतं. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात राजीव यांच्या वडिलांचं निधन झालं. कॉमेडियन सुनील पाल यांनीही राजीव यांचा मुलगा देवराजच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. देवराज आणि राजीव यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी लिहिले की, 'माझा प्रिय मित्र राजीव निगम यांचा मुलगा देवराज जग सोडून गेल्याचे वृत्त ऐकून मी निशब्द झालो आहे.' राजीव निगम बर्‍याच विनोदी कार्यक्रमांमध्ये दिसले आहेत. त्यांनी 'हर शाख पे उल्लू बैठा है' आणि 'कॉमेडी सर्कस' सारख्या कार्यक्रमात काम करून लोकांची मनं जिंकली आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35d7BUA