Full Width(True/False)

इम्रान खानचा अभिनयातून संन्यास, जवळच्या मित्रानेही केलं कन्फर्म

मुंबई- अभिनेता आणि देल्ली बेली, जाने तू या जाने ना सारख्या सिनेमांत काम केलेल्या इम्रान खानने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच दिवसांपासून इमरान मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आता त्याने अभिनयाला पूर्ण विराम देण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रानचा जवळचा मित्र आणि अभिनेता अक्षय ओबेरॉयने एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं. अक्षयने स्पष्ट मते इम्रान खानने आता अभिनय न करण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयने मुलाखतीत म्हटलं की, 'माझा सर्वात जवळचा मित्र इमरान खान आता अभिनेता म्हणून काम करणार नाही. त्याने अभिनय सोडला आहे. तो माझा इचका जवळचा मित्र आहे की मी मदतीसाठी त्याला पहाटे ४ वाजताही फोन करू शकतो. गेल्या १८ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. अभिनयानंतर इम्रानचं भविष्यातली योजना काय आहे असा प्रश्न अक्षयला विचारला असता त्याने स्पष्ट असं उत्तर दिलं नाही. पण इम्रान अभिनय सोडून दिग्दर्शनात पाऊल टाकेल अशी त्याला आशा आहे. त्याच्या मते इम्रानला सिनेमाबद्दल चांगली समज आहे. अशा परिस्थितीत तो स्वतः एखाद्या सिनेमाचं दिग्दर्शन करू शकतो. पण सध्या तरी इम्रान खानला प्रसिद्धीपासून दूर राहायचे आहे. त्याचबरोबर, सिनेमे फ्लॉप होणं हा प्रत्येकाच्या कारकिर्दीचा एक भाग असल्याचंही अक्षयने सांगितलं. इम्रानने बर्‍याच सिनेमांमध्ये काम केले. त्यातले काही चालले तर काही प्रेक्षकांची मनं जिंकण्यात अपयशी ठरले. अशा परिस्थितीत ते इम्रानचं अपयश होत नाही असंही त्याने स्पष्ट केलं. इम्रानच्या सिनेमाच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो अखेर 'कट्टी बट्टी' या सिनेमात दिसला होता. सिनेमात त्याने कंगना रणौतसोबत काम केलं होतं. याशिवाय इम्रानने 'जाने तू या जाने ना', 'किडनॅप', 'लक', 'आय हेट लव्ह स्टोरी' अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘देल्ली बेल्ली’ या सिनेमातील त्याच्या कामाचं कौतुकही करण्यात आलं होतं. इम्रान खानने आमिर खानच्या 'कयामत से कयामत' आणि 'जो जीती सिकंदर' या सिनेमांत बालकलाकार म्हणून काम केलं आहे. यानंतर त्याने २००८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २०१५ पर्यंत तो सिनेमांमध्ये सक्रिय होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38UqopZ