नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी अर्थात (BSNL) कडे प्रीपेड सेगमेंट मध्ये अनेक स्वस्त किंमतीचे प्लान उपलब्ध आहेत. बीएसएनएलने अनेकदा २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ३ जीबी डेटा रोज देणारे प्लान ऑफर केले आहेत. परंतु, या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे प्लान ४ जीब सर्विस नाही. यामुळे जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया यासारख्या खासगी टेलिकॉम कंपन्यांनी बीएसएनएलला मागे टाकले. वाचाः बीएसएनएलचा २४७ रुपयांचा रुपयांचा प्रीपेड STV STV २४७ बीएसएनएलचा एक खास प्रीपेड पॅक आहे. यात लोकल व एसटीडी कॉलिंग साठी अनलिमिटेड फ्री मिनिट्स मिळतात. यात २५० मिनिट प्रतिदिन एफयूव्ही लिमिट मिळते. या प्लानमध्ये ३ जीबी डेटाचा वापर करू शकतो. डेली डेटाची लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होऊन ती 80Kbps होते. यासाठी रोज १०० एसएमएस फ्री मिळते. वाचाः बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. परंतु, सध्या एका प्रमोशनल ऑफर अंतर्गत याची वैधता ४० दिवसांची केली आहे. एकूण मिळून या रिचार्जमध्ये ४० दिवसांसाठी १२० जीबी डेटा मिळतो. तसेच अन्य दुसऱ्या कंपन्याच्या किंमतीत ५० जीबी कमी डेटा मिळतो. एसटीव्ही २४७ सोबत हे प्रमोशनल ऑफर ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वैध आहे. वाचाः एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि जिओ प्लानमध्ये ३ जीबी डेटा रिलायन्स जिओ ३४९ रुपयांत रोज ३ जीबी डेटा, जिओ नेटवर्क अनलिमिटेड, नॉन जिओ नेटवर्कसाठी १ हजार एफयूव्ही मिनिट आणि १०० एसएमएस रोज ऑफर करतो. या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या २९८ रुपयांच्या पॅकमध्ये ३ जीबी डेटा रोज, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळतो. या पॅकची वैधता २८ दिवसांची आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nRRAdd