मुंबई- यांनी त्यांच्या वाढदिवसाला स्वतःचा बीचवर धावतानाचा एक नग्न फोटो शेअर केला होता. या फोटोवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. एवढंच नाही तर यासंबंधी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता मिलिंद यांची पत्नी हिनेही दोघांचे आणखीन फोटो शेअर केले आहेत. यात मिलिंद संपूर्ण दिसत नसले तरी ते शर्टलेस आहेत. तर पत्नी अंकिता स्विमसूटमध्ये आहे. मिलिंद यांनीही असाच एक फोटो शेअर केला आहे. मिलिंद सोमण विरोधात तक्रार दाखल केली मिलिंद सोमण यानं ४ नोव्हेंबर रोजी आपला ५५ वा वाढदिवस साजरा केला. मिलिंदनं गोव्याच्या बीचवर धावून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली. पण यावेळी त्याने नग्नावस्थेत बीचवर धावण्याला पसंती दिली. पत्नी अंकिताने त्याचा हा फोटो क्लिक केला होता. मिलिंद सोमणच्या या अनोख्या सेलिब्रेशनचं अनेकांनी कौतुक केलं. तर, काहींनी त्यावर टीका केली. आता त्याच्यावर कलम २९४ अश्लिल चाळे केल्याचा व गाणं गायल्याचा व कलम ६७ अंतर्गत सोशल मीडियावर अश्लिल साहित्याचा प्रसार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्ट्रोवर्सीमध्ये मिलिंद- अंकिताने पुन्हा पोस्ट केले फोटो या वादाच्या विरोधात मिलिंद आणि त्यांची पत्नी अंकिता यांनी एक सकारात्मक मेसेज देणारे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोमध्येही मिलिंद यांनी कपडे घातले नाहीत. पण हे फोटो क्लोजअप असल्याने त्यात अश्लील असं काही दिसत नाही. अंकिताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'माझ्या 'ड' जीवनसत्त्वाचा डोस आणि माझा अभिमान..' तर मिलिंदने लिहिले की, 'सगळीकडचे सूर्यास्त सुंदरच असतात.' यानंतर त्यांनी निसर्गाच्या सौंदर्याचं कौतुक केलं. अखेर त्यांनी लिहिलं की, 'परिस्थिती कशीही असली तरी सूर्यास्त सुंदरच असतो. तो नेहमीच आपल्याला साधं आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देत असतो.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3k7quwD