Full Width(True/False)

कृष्णा अभिषेकने दिली 'द कपिल शर्मा शो' सोडण्याची धमकी?

मुंबई- प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा त्याच्या टीमसोबत नुकताच कपिलच्या शोमध्ये पाहुणा म्हणून गेला होता आणि त्याच्या समोर कृष्णा अभिषेकने जाहीर केले की तो कपिलचा शो सोडून जात आहे. हे बोलल्यानंतर कृष्णाने सेटवर उपस्थित सर्वांचा निरोप घ्यायला सुरुवात केली. पण जेव्हा कृष्णाला कळलं की साऱ्यांच्याच चेहऱ्यावरचा रंग उडाला, ते पाहून कृष्णा हसू लागला. खरं तर कृष्णा अभिषेकने '' सोडण्याविषयी एक खास विनोद केला होता. सपनाची व्यक्तीरेरा साकारणाऱ्या कृष्णाने सेटवर एकाचवेळी किती सेलिब्रिटी बोलावणार असा प्रश्न कपिलला विचारला. तू शो सोडून का जातेस असा प्रश्न कपिलने सपनाला विचारला तेव्हा रागात सपना म्हणते की एका शोमध्ये एवढ्या सगळ्यांना एकत्र कोण बोलावतं? कपिलच्या शोमध्ये रेमो डिसूझाशिवाय पुनीत पाठक, धर्मेश, सलमान युसूफ खान आणि कोरिओग्राफरही येतात. यानंतर, कृष्णा अभिषेकने रेमो डिसूझाची थट्टा- मस्करी केली आणि म्हणाला की नॉन-कॉरियॉग्रफर्सलाही रेमो काम देतो. पण त्याच्याच इमारतीत राहणाऱ्या एका चांगल्या कलाकाराला तो काम देत नाही. या विकेण्डला हा एपिसोड दाखवण्यात येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Ib0Ny2