नवी दिल्लीः सॅमसंगने आपले दोन स्मार्टफोन आणि लाँच केले आहेत. बजेट सेगमेंटच्या या दोन्ही मोबाइल्सची खूप दिवसांपासून उत्सूकता होती. सॅमसंग गॅलेक्सी ए १२ ला १७९ यूरो म्हणजेच १५ हजार ८०० रुपयांत लाँच केले आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी ए०२एसला १५० यूरोप म्हणजेच १३ हजार ३०० रुपयांत लाँच केले आहे. या दोन्ही फोनमध्ये मोठी स्क्रीन, पॉवरफुल बॅटरी तसेच जबरदस्त फीचर्स दिले आहेत. वाचाः Samsung Galaxy A02S ची वैशिष्ट्ये सॅमसंगच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा HD+ Infinity-V डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रीन रिझॉल्यूशन 720x1520 पिक्सल आहे. रेड, ब्लॅक, आणि सफेद कलरमध्ये कंपनीने याला ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज सोबत लाँच केले आहे. अँड्रॉयड १० बेस्डच्या या फोनमध्ये क्वॉलकॉम SM4250 Snapdragon 450 प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. यात ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेऱ्यासोबत १३ मेगापिक्सलचा आणि २-२ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि मायक्रो लेन्स दिला आहे. वाचाः Samsung Galaxy A12 ची वैशिष्ट्ये Samsung Galaxy A12 मध्ये ६.५ इंचाचा स्क्रीन रिझॉल्यूशन 720x1560 पिक्सल दिला आहे. फोनला ब्लॅक, रेड आणि पांढऱ्या रंगात कंपनीने ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज अशा तीन व्हेरियंटमध्ये लाँच केले आहे. अँड्रॉयड १० बेस्ड फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर दिले आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए १२ मध्ये १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 5000 mAh बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आमि ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. भारतात हे फोन कधीपर्यंत लाँच करण्यात येणार आहेत. यासंबंधी कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3m4pyLi