Full Width(True/False)

Happy Birthday Aishwarya: 'त्या' प्रश्नाचं उत्तर देऊन ऐश्वर्या बनली होती 'मिस वर्ल्ड'

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी बच्चन हिचा आज वाढदिवस. जगभरात होणाऱ्या ब्युटी स्पर्धेत विजेता होण्यासाठी केवळ सुंदर दिसणं पुरेसं नसतं. तर त्या व्यक्तीची समज, त्याचे ज्ञान, त्याचा हजरजबाबीपणा पाहिला जातो. सुष्मिता सेन, राय बच्चन, मानुषी छिल्लर यांच्यासह आदींनी हटके उत्तरं देऊन मिस वर्ल्ड बनवण्याची संधी साधली होती. आज ऐश्वर्या राय बच्चनचा वाढदिवस असून १९९४ साली एका प्रश्नाला खास उत्तर देऊन ती मिस वर्ल्ड बनली होती. १९९४ साली झालेल्या मिस वर्ल्डच्या अंतिम फेरीत ऐश्वर्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता की, मिस वर्ल्ड होण्यासाठी कोणते गुण असायला हवेत? या प्रश्नाला उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली की, आतापर्यंत आम्ही जितके मिस वर्ल्ड पाहिली आहेत. त्या सर्वांमध्ये क्षमा भाव पाहायला मिळाला. त्यात केवळ मोठ्या लोकांसाठी क्षमा नव्हती तर ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यासाठीही क्षमा होती. आम्ही असे लोक पाहिले की जे लोक राष्ट्रीयता आणि रंगाच्या पलिकडे पाहू शकतात. आम्हाला त्यांच्या पेक्षाही अधिक पाहण्याची गरज आहे. तरच एक खरी मिस वर्ल्ड उठून दिसेल. एक खरा माणूस म्हणून दिसेल, असं उत्तर ऐश्वर्या हिनं दिलं होतं. तिच्या या प्रश्नाला सर्वांनीच दाद दिली होती. मिस वर्ल्ड स्पर्धेत ८७ देशांच्या तरुणींनी सहभाग घेतला होता. ऐश्वर्या रायने जजेसच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्यांचे मन जिंकले होते. ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड झाली त्यावेळी तिचे वय २१ वर्ष इतके होते. तसेच ती त्यावेळी आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होती. दरम्यान, वेब सीरिजचं वाढत चाललेलं प्रस्थ पाहता अनेक बडे कलाकार वेब सीरिजमध्ये पदार्पण करत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनदेखील वेबवर एंट्री करणार असल्याचं कळतंय.लवकरच ती या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. किंग खानची निर्मिती असणारी ही वेब सीरिज असेल. यातली तिची भूमिका कशी असेल, तसंच या वेब सीरिजचं शीर्षक सध्या गुलदस्त्यात आहे. ‘जज्बा’ आणि ‘फन्ने खान’ हे चित्रपट केल्यानंतर ऐश्वर्या राय लगेचच पुढच्या चित्रपटांना सुरुवात करणार, असं बोललं जात होतं. मात्र, ऐश्वर्यानं हे चित्रपट होल्डवर ठेवल्याचं, तर काही चित्रपटांतून अंग काढून घेतल्याची चर्चा आहे. ऐश्वर्यानं मणिरत्नम् यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट स्वीकारला आहे. त्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली होती. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाचं कामही सुरू झालं आहे. मध्य प्रदेशात त्याचा बहुतांश भाग चित्रित होणार आहे. ऐतिहासिक चित्रपट असल्यानं ऐश्वर्याच्या पेहराव आणि लूकवर सध्या टीम काही संशोधन करतेय अशी माहिती आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2JrakS8