Full Width(True/False)

Vi चा ९९ रुपयांचा प्लान सर्व सर्कल्समध्ये लागू, अनलिमिटेड कॉलिंगसोबत डेटाही

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी () ने आपला ९९ रुपयांचा अनलिमिटेड प्लानची उपलब्धता वाढवली आहे. कंपनीने आता या प्लानला देशभरात जारी केले आहे. यावरून आता व्हीआयच्या १९ रुपयांच्या प्रीपेड प्लाननंतर आता दुसरा स्वस्त अनलिमिटेड प्लान बनला आहे. वाचाः Vi चा ९९ रुपयांचा प्लान कंपनीचा अनलिमिटेड प्रीपेड प्लान आहे. ज्यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. यात १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस दिले जातात. प्लानची वैधता १८ दिवसांची आहे. कंपनीने आधी या प्लानला पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश पश्चिम, उत्तर प्रदेश पूर्व यासारख्या सर्कल्सपर्यंत सिमीत ठेवले होते. परंतु, आता कंपनीने सर्व सर्कल्समध्ये याला जारी केले आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात Vi मूव्हीज अँड टीव्ही यासारख्या अॅपचे अॅक्सेस मिळत नाही. वाचाः जिओचा १२९ रुपयांचा प्लान प्रतिस्पर्धी कंपनी जिओचा सर्वात स्वस्त प्लान १२९ रुपयांचा आहे. यात २८ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये २ जीबी डेटा मिळतो. जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग साठी १ हजार मिनिट्स मिळतात. तसेच ३०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः एअरटेलचा १२९ रुपयांचा प्लान एअरटेल सुद्धा १९ रुपयांनंतर १२९ रुपयांचा प्लान ऑफर करते. प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, १ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस मिळतात. तसेच याशिवाय, विंक म्यूझिक, एअरटेल एक्स्ट्रीम आणि फ्री हेलोट्यून्सची सुविधा मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IwSHzD