Full Width(True/False)

'संपूर्ण दिवाळी आरती'....टाइम्स म्युझिकची प्रेक्षकांना संगीतमय भेट

मुंबई: प्रत्येक सण हा खास असतो, या सणांना आणखी खास बनवण्यासाठी टाइम्स म्युझिक नेहमीच प्रेक्षकांना संगीतमय भेट मिळत असते. यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावरही टाइम्स म्युझिकनं एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. 'संपूर्ण दिवाळी आरती' या चार व्हिडिओंचा अल्बम प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रसिद्ध गायिका , ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी, गायक आणि यांसारखे दिग्गज कलाकार या व्हिडिओंसाठी एकत्र आले आहेत. दिवाळीचे खास मंत्र, पूजा विधी, स्त्रोत्र आणि आरती या अल्बमध्ये प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळं ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. श्रेया घोषाल हिनं तिच्या गोड आवाजात गायलेल्या काही निवडक आरत्यांचा या अल्बमध्ये समावेश आहे. श्रेयस पुराणिक यांनी या आरत्यांना संगीत दिलं आहे.तर शंकर महादेव यांनी गायलेली आरती शैलेश दानी यांनी संगीतबद्ध केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pnbgre